World Athletics Relays : भारतीय महिला अन् पुरुष संघाची रिलेमध्ये दमदार कामगिरी, आता ऑलिम्पिक पदकासाठी पॅरिसमध्ये धावणार

भारतीय महिला आणि पुरुषांचे 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले.
World Athletics Relays
World Athletics RelaysEsakal

India’s men’s and women’s 4x400m teams qualify for Paris 2024 Olympics : भारतीय महिला आणि पुरुष रिले संघ 4x400 मीटर रिलेमध्ये पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहेत. बहामास येथे सुरू असलेल्या जागतिक ॲथलेटिक्स रिलेमध्ये सोमवारी भारतीय महिला संघाने दुसऱ्या फेरीतील हीटमध्ये दुसरे स्थान पटकावले. तर पुरुष संघानेही दुसऱ्या हीटमध्ये दुसरे स्थान मिळवून पात्रता मिळवली.

World Athletics Relays
क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

रुपल चौधरी, एम आर पूवम्मा, ज्योतिका श्री दांडी आणि सुभा वेंकटेशन यांनी तीन मिनिटे आणि 29.35 सेकंदात जमैका (3:28.54) च्या मागे हीट नंबर वनमध्ये दुसरे स्थान पटकावले. तत्पूर्वी, भारतीय संघाने रविवारी पहिल्या फेरीच्या पात्रता फेरीत तीन मिनिटे आणि 29.74 सेकंद वेळेसह पाचवे स्थान पटकावले होते.

World Athletics Relays
MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', चेन्नईच्या थालावर भडकला मुंबईचा माजी कर्णधार

पुरुष संघाने पटकावला दुसरा क्रमांक

मोहम्मद अनस याहिया, मोहम्मद अजमल, अरोकिया राजीव आणि अमोज जेकब यांच्या पुरुष संघाने 3:3.23 सेकंदांची वेळ नोंदवत अमेरिकेच्या (2:59.95) मागे दुसरे स्थान पटकावले. दुसऱ्या फेरीतील तीन हीटमधील अव्वल दोन संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरतील अशी माहिती आहे. पॅरिस ऑलिम्पिक यावर्षी 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान होणार आहे.

World Athletics Relays
क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताकडे 19 ट्रॅक आणि फील्ड ऍथलीट आहेत, ज्यात टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा देखील आहे. पॅरिस ऑलिम्पिकमधील ॲथलेटिक्स स्पर्धा 1 ऑगस्टपासून सुरू होणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com