World Badminton Championships : पाच वेळच्या जगज्जेत्यास प्रणॉयचा पंच

World Badminton Championships  H S Prannoy
World Badminton Championships H S Prannoy

मुंबई/बासेल -  अर्जुन पुरस्कार नाकारल्याची नाराजी आपल्या रॅकेटने व्यक्त करीत एच. एस. प्रणॉयने बॅडमिंटन जगताचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. त्याने सोमवारी जागतिक बॅडमिंटनच्या दुसऱ्या फेरीत माजी जगज्जेत्या लीन डॅन याचा पराभव केला. ही कामगिरी करताना तो गोपीचंद यांच्यापेक्षा सरस ठरला आहे.

प्रणॉय हा कायम लीन डॅनची डोकेदुखी ठरला आहे. लीन डॅनने दोनदा ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकले आहे, तर पाच वेळा जागतिक विजेतेपद; पण प्रणॉयसमोर तो अपयशी ठरतो. आत्ताही प्रणॉयने लीन डॅनविरुद्धचा तिसरा विजय मिळवताना २१-११, १३-२१, २१-७ अशी बाजी मारली. या ६१ मिनिटे चाललेल्या लढतीत दुसऱ्या गेमचा अपवाद सोडल्यास प्रणॉयने कधीही वर्चस्व गमावले नाही.

जागतिक क्रमवारीत गेल्या काही महिन्यांत पीछेहाट झालेल्या प्रणॉयने पहिल्या गेममध्ये २-२ बरोबरी सातत्याने आघाडी राखली. प्रणॉयच्या ६-२ आघाडीनंतर लीन डॅन मागेच पडत गेला. संयम आणि आक्रमकता याचा सुरेख संगम साधत प्रणॉय सहज बाजी मारणार असेच दिसत होते. अर्थात तो गाफील नव्हता. डॅनने पहिल्या फेरीत पहिला गेम गमावल्यावर बाजी मारली आहे हे प्रणॉय जाणून होता. त्यामुळे डॅन आक्रमक असेल, हे जाणूनच प्रणॉयने व्यूहरचना केली होती. दुसऱ्या गेममध्ये डॅनचे ड्रॉप प्रभावी ठरू लागले. त्यातच प्रणॉयकडून चुका झाल्या. निर्णायक गेममध्ये प्रणॉयने जणू कात टाकली. त्याने सुरवातीस ४-१ आघाडी घेतली. त्याने रॅलीवर हुकमत राखली आणि त्याला स्मॅशची जोड देत आघाडी वाढवत नेली. 

साई प्रणित याने देखील आगेकूच कायम ठेवताना कोरियाच्या डाँग केऊन ली याचा २१-१६, २१-१५ असा पराभव केला. 

साईना, सिंधूची मोहीम आजपासून
पहिल्या फेरीत बाय मिळालेल्या साईना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधूची मोहीम उद्यापासून सुरू होईल. सिंधूची लढत साडेतीनच्या सुमारास सुरू होण्याची शक्‍यता आहे. अर्थात, यापूर्वीच्या लढती लांबल्यास त्यात बदल होऊ शकतो. साईना नेहवालची लढत सातच्या सुमारास होऊ शकेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com