टीम इंडियाला फक्त हेच 11 खेळाडू हरवू शकतात, बघा कोण आहेत ते

वृत्तसंस्था
Tuesday, 22 October 2019

भारतीय संघ सध्या कसोटी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत सर्वत्र हवा करत आहे. भारतीय संघाला सध्याच्या घडीला पराभूत करु शकले असा संघ कोणताच वाटत नाही . भारतीय संघाने सलग 11 कसोटी मालिका जिंकून विश्वविक्रम केला आहे. मात्र, या संघाल पराभूत करण्यासाठी दिग्गज क्रिकेटपटूंनी जगातील सर्वोत्तम खेळाडूंची संघ तयार केली आहे. बघा कोणते खेळाडू आहेत या संघात.

रांची : भारतीय संघ सध्या कसोटी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत सर्वत्र हवा करत आहे. भारतीय संघाला सध्याच्या घडीला पराभूत करु शकले असा संघ कोणताच वाटत नाही . भारतीय संघाने सलग 11 कसोटी मालिका जिंकून विश्वविक्रम केला आहे. मात्र, या संघाल पराभूत करण्यासाठी दिग्गज क्रिकेटपटूंनी जगातील सर्वोत्तम खेळाडूंची संघ तयार केली आहे. बघा कोणते खेळाडू आहेत या संघात.

कसोटी खेळणाऱ्या देशांपैकी कोणताही एकच संघ भारताला मायदेशात पराभूत करू शकत नाही असं मत दिग्गजांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे भारताला पराभूत करण्यासाठी जगातील 11 खेळाडूंचा एक संघ दिग्गज खेळाडूंनी तयार केला आहे. यामध्ये वेगवेगळ्या देशातील खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. भारतामधील कामगिरीच्या जोरावर खेळाडू निवडले असून यादी तयार करण्यात आली आहे.

रांचीमध्ये सुरु असलेल्या कसोटी सामन्यावेळी तिसऱ्या दिवशी उपहारासाठी खेळ थांबवण्यात आला तेव्हा क्रिकेट समालोचक आणि माजी खेळाडूंनी वर्ल्ड इलेव्हन संघाबद्दल मत व्यक्त केलं. व्हीव्हीएस लक्ष्मण, इरफान पठाण, आकाश चोपरा आणि जतिन सापरु यांनी याबद्दल प्रेक्षकांना सांगितलं. 

असा आहे तो संघ : टॉम लॅथम, डिन एल्गर, केन व्हिल्यम्सन (कर्णधार) स्टिव्ह स्मिथ, बाबर आझम, शाकिब अल हसन, बेन स्टोक्स, मुशपिकूर रहमान (यष्टीरक्षक), नेथन लायन, पॅट कमिन्स, ट्रेंट बोल्ट, राशिद खान, जोफ्रा आर्चर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World best XI against India teat cricket