जगज्जेत्या सिंधूला विजय गवसेना

पी व्ही सिंधू
पी व्ही सिंधू

मुंबई : चायना ओपनच्या दुसऱ्या फेरीत पराजित झालेल्या पी. व्ही. सिंधूला कोरिया ओपनच्या पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला. कोरिया ओपनचा पहिला दिवस भारतीयांसाठी खूपच खराब ठरला. इनचॉन येथे सुरू झालेल्या या स्पर्धेत पारुपली कश्‍यपचा पहिल्या फेरीतील विजय सोडल्यास अन्य आव्हान आटोपले आहे.

जगज्जेती सिंधू अमेरिकेच्या बेईवॅन झॅंगविरुद्ध 21-7, 22-24, 15-21 अशी पराजित झाली. पहिला गेम सहज जिंकलेल्या सिंधूने चुरशीच्या दुसऱ्या गेममध्ये वर्चस्व राखले होते. एवढेच नव्हे, तर मॅच पॉईंटही मिळवला होता, पण तिने तो दवडला आणि त्यानंतर सिंधूच्या चुका वाढतच गेल्या.

दुसरा गेम जादा गुणांवर गमावल्यावर तिसऱ्या गेममध्ये तिला वर्चस्व मिळवले, असे वाटत असताना गुण दवडत होती. यामुळे तिला हार पत्करावी लागली. चायना तसेच कोरियन स्पर्धेत सिंधूला हरवलेल्या प्रतिस्पर्धींनी तिच्याविरुद्धच्या यापूर्वीच्या लढती गमावल्या होत्या.

जागतिक विजेतेपदाच्या वेळी मोलाचे मार्गदर्शन केलेल्या किम जी ह्यून या सोडून गेल्यामुळे सिंधू निराश आहे. याचा तिच्या खेळावर परिणाम होत आहे. किम यांनी न्यूझीलंडला जाण्यापूर्वी आपले परतणे अवघड असल्याची कल्पना सिंधूला दिली होती, असे सांगितले जात आहे.

पारुपली कश्‍यपने सलामीची लढत जिंकताना लु चिआ याला 21-16, 21-16 असे हरवले आणि भारताचे आव्हान राखले. दरम्यान, सात्विकसाईराज रांकीरेड्डी - चिराग शेट्टीने चौथ्या मानांकित जपानी जोडीस कडवे आव्हान देताना दुसरा गेम जिंकला, पण अखेर ते पराजित झाले. मनू अत्री - बी सुमीत रेड्डी यांनाही चिनी जोडीविरुद्ध तीन गेममध्ये हार पत्करावी लागली.

माघारीचे सत्र
जागतिक ब्रॉंझविजेत्या बी. साई प्रणीतने पाचव्या मानांकित अँडर्स अँतॉनसेनविरुद्धची लढत 9-21, 7-11 अशी पिछाडीवर असताना सोडून दिली. साईना नेहवालने किम गा एऊनविरुद्ध 21-19,18-21, 1-8 पिछाडी असताना लढत सोडून दिली. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी महिला एकेरीत अव्वल मानांकित अकेन यामागुचीसह चायना ओपन विजेती ली झुएरुई यांनीही आपली लढत सोडून दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com