World Cup 2022 : जसप्रीत बुमराऐवजी महम्मद शमीला संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mohammed Shami

T20 World Cup 2022 : जसप्रीत बुमराऐवजी महम्मद शमीला संधी

मुंबई : भारतीय गोलंदाजीचे क्षेपणास्त्र म्हणून ओळख असलेला जसप्रीत बुमरा जायबंदी झाल्यानंतर त्याच्या पर्यायाची शोध मोहीम अखेर पूर्ण झाली आणि महम्मद शमीची येत्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड जाहीर करण्यात आली.

हेही वाचा: FIFA World Cup 2022 : संभाव्य विजेते ब्राझीलची मोरोक्कोवर १-० मात

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या या विश्वकरंडक स्पर्धेसाठी बुमरा खेळणार नाही हे निश्चित झाल्यानंतर निवड समितीने अनेक पर्याय तपासले. राखीव खेळाडूंत असलेला दीपक चहर त्यात आघाडीवर होता. महम्मद सिराज, आवेश खान यांनाही दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी संधी देण्यात आली होती, अखेर महम्मद शमीच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

हेही वाचा: T20 World Cup 2022 : जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत काय आहे भारताचा प्लॅन B?

सराव सामन्यात खेळणार

बीसीसीआयने आज हा बदल अधिकृतपणे जाहीर करण्याअगोदरच शमी ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे. ब्रिस्बेन येथे होणाऱ्या भारताच्या सराव सामन्यात शमी खेळणार असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा: T20 World Cup 2022 विजेता संघ होणार मालामाल; ICC कडून तब्बल 45 कोटींची बक्षिसे

शार्दुल, सिराज बॅअकप गोलंदाज

महम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूरही लवकरच ऑस्ट्रेलियात दाखल होणार आहेत ते भारतीय संघाचा भाग नसले तरी संघासोबत असतील

हेही वाचा: T20 World Cup 2022 : विश्वकरंडकात जडेजाची उणीव भासेल : जयवर्धने

शमीची टी-२० मधील कामगिरी

सामने १७

विकेट १८

सर्वोत्तम : ३/१५

सरासरी : ३१.५५

हेही वाचा: T20 World Cup 2022 : भारतीय संघातून 'पाच' जणांचा पत्ता कट?

गेल्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेतील कामगिरी

पाकविरुद्ध : ३.५-०-४३-०

न्यूझीलंडविरुद्द : १-०-११-०

अफगाणिस्तानविरुद्ध : ४-०-३२-३

स्कॉटलंडविरुद्ध : ३-१-१५-३

नामिबियाविरुद्ध : ४-०-३९-०