World Cup 2023 : हिरव्यागार खेळपट्ट्या अन् मोठी मैदाने... ICC कडून उचलण्यात आले मोठे पाऊल!

World Cup 2023 70m boundaries
World Cup 2023 70m boundariessakal

World Cup 2023 : भारतामध्ये पाच ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट विश्‍वकरंडकासाठी आयसीसीकडून काही सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार आता प्रत्येक लढतीसाठी सीमारेषा ही कमीतकमी ७० मीटरची असणार आहे. तसेच खेळपट्टीवर गवत ठेवण्याचे आदेशही आयसीसीकडून क्युरेटर्संना देण्यात आले आहेत.

World Cup 2023 70m boundaries
Virat Kohli : कोहलीने पंजाबी सिंगर शुभनीत खलिस्तानी आंदोलन समर्थक असल्याचे समजताच उचललं मोठं पाऊल

विश्‍वकरंडकात गोलंदाज व फलंदाज यांना समसमान संधी असायला हवी, यासाठी आयसीसीकडून पाऊल उचलण्यात आले आहे. त्यानुसार सीमारेषा ही ७० मीटरची करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमानुसार कमीतकमी ६५ मीटरची सीमारेषा असणे आवश्‍यक आहे. तसेच जास्तीतजास्त ८५ मीटरची रेषा असणे गरजेचे आहे. ज्या स्टेडियमचे नूतनीकरण झालेले नाही, अशा स्टेडियममध्ये सीमारेषा ७० ते ७५ मीटर इतकी असते. विश्‍वकरंडकात ७० मीटरची सीमारेषा केल्यामुळे आता फलंदाजांना अगदी सहजतेने चौकार व षटकार मारता येणार नाही. गोलंदाजांनाही आपली चमक दाखवण्याची संधी मिळेल.

World Cup 2023 70m boundaries
Mohammed Siraj ODI Ranking : रँकिंगचा सरताज पुन्हा मोहम्मद सिराज! आयसीसीने केली मोठी घोषणा

वेगवान गोलंदाजांनाही मदत

भारतामध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विश्‍वकरंडकाचा थरार रंगणार आहे. या दरम्यान भारतामधील उत्तर, पश्‍चिम व पूर्व या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे. अशा वेळी ओलसर खेळपट्टीमुळे चेंडूवर ग्रीप मिळणे अवघड होते. त्यामुळे फिरकी गोलंदाजांसमोर आव्हान निर्माण होते. मात्र खेळपट्टीवर गवत ठेवल्यास संघांना फक्त फिरकी गोलंदाजांवर अवलंबून राहता येणार नाही. वेगवान गोलंदाजही त्यांच्या दिमतीला असतील. यामुळे खेळपट्टीवर गवत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

याआधी अमिराती येथे झालेल्या टी-२० विश्‍वकरंडकात मैदानावर दव पडल्यामुळे बहुतांशी लढतींमध्ये धावांचा पाठलाग करणारा संघ विजयी झाला. एकतर्फी लढतींमध्ये क्रिकेट या खेळातील रंगतच निघून गेली. या विश्‍वकरंडकात गोलंदाजांना चेंडूवर ग्रीप करता आली नाही. याच कारणामुळे आगामी विश्‍वकरंडकात पुन्हा तीच परिस्थिती ओढवू नये यासाठी त्यावर तोडगा काढण्यात येत आहे. आता खेळपट्टीवर गवत ठेवण्यात आल्यानंतर वेगवान गोलंदाज त्यावर आपला ठसा उमटवू शकणार आहेत.

या शहरांमध्ये होणार लढती

भारतातील विश्‍वकरंडकातील लढती दहा शहरांमध्ये होणार आहेत. यामध्ये मुंबई, अहमदाबाद, बंगळूर, चेन्नई, दिल्ली, धर्मशाला, हैदराबाद, कोलकाता, लखनौ, पुणे येथील स्टेडियममध्ये विश्‍वकरंडकाच्या लढती रंगणार आहेत. तसेच हैदराबाद, तिरुअनंतपुरम व गुवाहाटी येथे सराव सामन्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. २९ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरदरम्यान सराव लढती रंगणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com