PAK Vs AFG : अफगाणिस्तानचा पाकिस्तानला जोरदार दणका! बाबरच्या संघाची पराभवाची 'हॅट्रिक'

PAK Vs AFG World Cup 2023
PAK Vs AFG World Cup 2023

PAK Vs AFG World Cup 2023 : वर्ल्ड कप 2023 च्या स्पर्धेत अफगाणिस्तानने आणखी एक विजय मिळवून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. मागील सामन्यात विश्वविजेत्या इंग्लंडला पराभूत केल्यानंतर हशमतुल्ला शाहिदीच्या नेतृत्वाखालील संघाने आता बाबर आझमच्या पाकिस्तानी संघाचा पराभव करून जोरदार दणका दिला आहे.

चेन्नई येथे झालेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानचा 8 गडी राखून पराभव केला. नूर अहमदच्या अप्रतिम गोलंदाजीमुळे अफगाणिस्तानने पाकिस्तानला 282 धावांत रोखले. यानंतर इब्राहिमी झद्रान आणि रहमानउल्ला गुरबाज यांच्या स्फोटक सलामीच्या भागीदारीच्या जोरावर अफगाणिस्तानने एकदिवसीय क्रिकेटमध्ये प्रथमच पाकिस्तानचा पराभव केला.

PAK Vs AFG World Cup 2023
Bishan Singh Bedi : वयाच्या 50 व्या वर्षी त्याने स्टीव्ह वॉची विकेट काढली, असा बेदी पुन्हा होणे नाही

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत सात गडी गमावून 282 धावा केल्या. पाकिस्तानकडून बाबर आझम आणि अब्दुल्ला शफीक यांनी अर्धशतके झळकावली. बाबरने सर्वाधिक 74 धावा केल्या तर अब्दुल्ला शफीकने 58 धावांची खेळी केली.

अखेरच्या षटकांमध्ये शादाब खान आणि इफ्तिखार अहमद यांनी शानदार फलंदाजी करत संघाला 282 धावांपर्यंत नेले. दोघांनी 40-40 धावांचे योगदान दिले. सौद शकीलने 25 आणि इमाम उल हकने 17 धावा केल्या. मोहम्मद रिझवानला केवळ आठ धावा करता आल्या. शाहीन आफ्रिदी तीन धावा करून नाबाद राहिला.

अफगाणिस्तानकडून नूर अहमदने तीन आणि नवीन उल हकने दोन गडी बाद केले. मोहम्मद नबी आणि अजमतुल्ला उमरझाई यांना प्रत्येकी एक विकेट घेतला.

283 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तान संघाच्या सलामीवीरांनी आक्रमक सुरुवात केली. रहमानउल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रान यांच्यासमोर पाकिस्तानच्या सर्व गोलंदाज अपयशी ठरल्याचं दिसत होतं. गुरबाजने 65 धावांची खेळी केली तर जद्रानने 87 धावा केल्या. यानंतर रहमत शाहनेही वाहत्या गंगेत हात धुवून अर्धशतक केले. त्याने 77 धावांची नाबाद खेळी खेळली.

अफगाणिस्तानने पाकिस्तानला हरवून इतिहास रचला आहे. याआधी या संघाने पाकिस्तानला एकदिवसीय सामन्यात पराभूत केले नव्हते. पण यावेळी अफगाणिस्तानने मोठ्या मंचावर पाकिस्तानचा 8 विकेट्सने पराभव केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com