World Cup 2023 : '३०/४० धावा कमी पडल्या...' पराभवानंतर कोच स्पष्टच बोले

World Cup 2023
World Cup 2023

World Cup 2023 : ऑस्ट्रेलियन संघाकडून गुरुवारी दक्षिण आफ्रिकन क्रिकेट संघाला उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांचे जेतेपद पटकावण्याचे स्वप्न भंग पावले. याप्रसंगी दक्षिण आफ्रिकन क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रॉब वॉल्टर म्हणाले, ऑस्ट्रेलियाविरुद्ध आम्ही दबावाखाली खेळलो नाही. दोन अव्वल दर्जाच्या संघांमध्ये तुल्यबळ लढत रंगली. आम्ही २७० धावा केल्या असत्या, तर कदाचित निकाल वेगळा लागू शकला असता. ३० ते ४० धावा कमी केल्या. यामुळे आमचा पराभव झाला.

World Cup 2023
'अयोध्येतील राम मंदिरात जो हिंदू जाईल तो मुस्लिम म्हणून बाहेर येईल...' पाकिस्तानी खेळाडूचा तो व्हिडिओ व्हायरल

उपांत्य लढतीत कगिसो रबाडाने फक्त सहा षटके गोलंदाजी केली. याबाबत रॉब वॉल्टर म्हणाले, रबाडा आमच्या वेगवान गोलंदाजीचा आधारस्तंभ आहे. मात्र दुखापतीमुळे त्याला फक्त सहाच षटके गोलंदाजी करता आली. याचा फटकाही आमच्या संघाला बसला.

पॉवरप्लेमधील कामगिरी निर्णायक

रॉब वॉल्टर म्हणाले, पॉवरप्लेमधील कामगिरी याप्रसंगी निर्णायक ठरली. पॉवरप्लेमध्ये दक्षिण आफ्रिकने विकेट गमावल्या. ऑस्ट्रेलियाने मात्र पहिल्या पॉवरप्लेमध्ये आक्रमक फलंदाजी केली. जय-पराजयमधला फरक हाच होता.

भविष्यात विश्‍वकरंडक जिंकू ः डेव्हिड मिलर

दक्षिण आफ्रिकन क्रिकेट संघाचे विश्‍वकरंडक जिंकण्याचे स्वप्न यंदाही अधुरेच राहिले. या वेळी डेव्हिड मिलर म्हणाला, स्पर्धा सुरू होण्याआधी आम्ही ठरवले होते की, दबाव न घेता आनंद घेत क्रिकेट खेळायचे. प्रत्यक्षात आमच्याकडून छान खेळ झाला. त्यामुळेच उपांत्य फेरीतील पराभव जिव्हारी लागला आहे. मात्र भविष्यात आम्ही विश्‍वकरंडक जिंकू शकतो, असा विश्‍वास निर्माण झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com