CWC23 Opening Ceremony : BCCI चा धसमुसळा कारभार! आधी वेळापत्रक मग तिकीट विक्री आता उद्घाटन सोहळ्यात बोटचेपी भूमिका

World Cup 2023 Opening Ceremony
World Cup 2023 Opening Ceremonyesakal

World Cup 2023 Opening Ceremony : बीसीसीआयने यंदाचा वर्ल्डकप पूर्णपणे भारतात आयोजित करण्याचं शिवधनुष्य उचललं आहे. मात्र यंदाच्या वर्ल्डकप आयोजनात वेळापत्रकापासून उद्घाटन सोहळ्यापर्यंत बीसीसीआयने गोंधळच घातला आहे.

आधी वर्ल्डकप सामन्याच्या ठिकाणांवरून गोधळ झाला. त्यामुळे वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर करण्यात उशीर झाला. त्यानंतर तिकीट विक्रीची प्रक्रिया देखील चाहत्यांसाठी डोकेदुखी देणारीच ठरली.

आता वर्ल्डकपच्या उद्घाटन सोहळ्याबाबत देखील त्यांनी बोटचेपी भुमिका घेतली. मिळालेल्या नव्या माहितीनुसार 4 ऑक्टोबर म्हणजे आज उद्घाटन सोहळा होणार नाही. यामुळे चाहते प्रचंड नाराज झाले आहेत.

World Cup 2023 Opening Ceremony
Asian Games 2023 : स्क्वॉशमध्ये कांस्य पदक; भारताने एशियन गेम्समध्ये रचला इतिहास

इनसाईड स्पोर्ट्सने आधी बीसीसीआय 4 ऑक्टोबरला ग्रँड असा उद्घाटन सोहळा आयोजित करणार असल्याचे वृत्त दिले होते. यात आशा भोसले, रणवीर सिंह, तमन्ना भाटिया, श्रेया घोषाल, शंकर महादेवन आणि अरिजित सिंह हे दिग्गज आपली कला सादर करणार होते. मात्र दैनिक जागरणनने दिलेल्या नव्या माहितीनुसार यंदाच्या वर्ल्डकपसाठी कोणताही उद्घाटन सोहळा होणार नाहीये.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआय आज फक्त 10 संघांच्या कर्णधारांच्या भेटीचा कार्यक्रम आयोजित करणार आहे. त्यानंतर उद्घाटन सोहळ्याऐवजी लेसर शो होईल. बीसीसीआय 19 नोव्हेंबरला सांगता समारंभ आणि 14 ऑक्टोबरला भारत - पाकिस्तान सामन्यापूर्वी एक भव्यदिव्य कार्यक्रम करणार आहे. बीसीसीआयच्या या ढिसाळ कारभारावर क्रिकेट चाहते नाराज आहेत.

World Cup 2023 Opening Ceremony
Cricket News : भारताचा विजय, पण नेपाळने झुंजवले ; यशस्वी भारताचा सर्वांत लहान शतकवीर

बॉलीवूड स्टारविनाच होणार उद्घाटन

बीसीसीआयने उद्घाटन सोहळा रद्द केला. या दिवसासाठी जय्यत तयारी सुरू होती. स्टेज देखील सजल होते. त्यावर कलाकार तयारी देखील करत होते. मात्र आता हा कार्यक्रमच रद्द झाला आहे.

उद्घाटन सोहळ्यापूर्वी सहभागी 10 संघांचे कर्णधार अहमदाबादमध्ये 3 ऑक्टोबरलाच दाखल झाले आहेत. हा सोहळा आदल्या दिवशीच होणार आहे कारण फायरवर्क आणि लेसर शो हे दिवसा आयोजित करता येणार नाहीत.

(Cricket Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com