World Cup 2023 : रोहितला डच्चू तर विराट कॅप्टन... क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा खोडसाळपणा

World Cup 2023 : रोहितला डच्चू तर विराट कॅप्टन...  क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा खोडसाळपणा

World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप 2023 ची लीग स्टेज संपुष्टात आली आहे. 10 संघापैकी यजमान भारतासह दक्षिण अफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या संघांनी सेमी फायनल गाठली आहे. यंदाच्या वर्ल्डकपमधील भारतीय संघ हा एकमेव संघ आहे ज्याने अजून पराजय पाहिला नाही.

दरम्यान, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने लीग स्टेज संपल्यानंतर स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वोत्तम 12 जणांची टीम निवडली. आश्चर्यकारकरित्या भारताचा कर्णधार रोहित शर्माला या संघातून वगळण्यात आलं आहे. या संघाचा कर्णधार विराट कोहलीला करण्यात आलं असून यात मोहम्मद शामी, जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजा यांचा समावेश आहे.

World Cup 2023 : रोहितला डच्चू तर विराट कॅप्टन...  क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा खोडसाळपणा
Morne Morkel : पाकिस्तानचा भारतातील वर्ल्डकपमधून गाशा गुंडाळल्यानंतर संघात सुरू झालं राजीनामा सत्र?

भारतीय संघाने आतापर्यंत स्पर्धेत अष्टपैलू कामगिरी केली आहे. संघातील प्रत्येक खेळाडूने संधी मिळताच चांगली कामगिरी केली आहे. संघ आता वर्ल्डकप हातात घेण्यापासून फक्त दोन पावलं मागं आहे. दक्षिण अफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाने यंदच्या वर्ल्डकपमध्ये प्रत्येकी 2 सामने गमावले आहेत तर न्यूझीलंडने लीग स्टेजमधील 9 पैकी 5 सामने जिंकत सेमी फायनल गाठली.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाची स्पर्धेतील सर्वोत्तम टीम

क्विंटन डिकॉक

डिकॉकने 9 सामन्यात 591 धावा केल्या असून त्याने 65.67 ची सरासरी राखली आहे. त्याने 4 शतकी खेळी केल्या आहेत.

डेव्हिड वॉर्नर

डेव्हिड वॉर्नरने 9 सामन्यात 499 धावा केल्या असून त्याची सरासरी 55.44 इतकी आहे. त्याने 2 शतके तर 2 अर्धशतके ठोकली आहेत.

रचिन रविंद्र

न्यूझींडलच्या या युवा फलंदाजाने 9 सामन्यात 565 धावा केल्या आहेत. त्यात 3 शतके तर दोन अर्धशतकांचा समावेश आहे. याचबरोबर त्याने 5.68 च्या इकॉनॉमीने गोलंदाजी करत 5 विकेट्स घेतल्या आहेत.

विराट कोहली

विराट कोहलीने 594 धावा केल्या असून यात 2 शतके तर 5 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची स्पर्धेतील सर्वोत्तम खेळी ही 103 धावांची आहे.

एडिन मारक्ररम

मारक्रमने 49.50 च्या सरासरीने 396 धावा केल्या असून त्याने एक शतक आणि 3 अर्धशतके ठोकली आहेत.

ग्लेन मॅक्सवेल

सात सामन्यात 397 धावा करणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलने या धावा 152.7 च्या स्ट्राईक रेटने ठोकल्या आहेत. त्याने दोन शतकी खेळी केल्या आहेत. त्याची बेस्ट इंनिंग ही अफगाणिस्तानविरूद्धची 201 धावांची इनिंग ठरली. त्याने आतापर्यंत 5 विकेट्स देखील घेतल्या आहेत.

मार्को यान्सेन

मार्को यान्सेनने 8 सामन्यात 157 धावा केल्या असून 6.40 च्या इकॉनॉमीने 17 विकेट्स देखील घेतल्या.

रविंद्र जडेजा

रविंद्र जडेजाने 9 सामन्यात 115.6 च्या स्ट्राईक रेटने 111 धावा केल्या आहेत. त्याने 3.96 च्या इकॉनॉमीने 16 विकेट्स घेतल्या.

मोहम्मद शामी

मोहम्मद शामीने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये 5 सामन्यात 16 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने दोन वेळा पाच विकेट्स घेण्याची किमया केली.

अॅडम झाम्पा

ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर अॅडम झाम्पाने 9 सामन्यात 22 विकेट्स घेतल्या आहेत. तेही 5.27 च्या इकॉनॉमीने धावा देत.

जसप्रीत बुमराह

जसप्रीत बुमराहने 17 विकेट्स घेतल्या आहेत. बुमराह हा स्पर्धेतील टॉप विकेट टेकरमधल्या गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने 3.65 च्या इकॉनॉमीने धावा दिल्या आहेत.

दिलशान मदुशांका

संघातील 12 वा खेळाडू म्हणून श्रीलंकेच्या दिलशान मदुशांकाची निवड करण्यात आली आहे. त्याने 9 सामन्यात 21 विकेट्स घेत आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं होतं. मात्र श्रीलंका काही सेमी फायनलसाठी पात्र होऊ शकली नाही.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com