World Cup 2023 : वर्ल्ड कप 2023 सोबतच 'या' दिग्गज खेळाडूची कारकीर्द संपली! आता कधीच खेळणार नाही ODI क्रिकेट

वर्ल्ड कप 2023 : ऑस्ट्रेलियाने दक्षिण अफ्रिकेची झुंज काढली मोडून, 3 विकेट्सनी पराभव करत गाठली फायनल
Quinton de Kock
Quinton de Kock esakal

ODI World Cup 2023 : भारतात खेळल्या जाणार्‍या एकदिवसीय वर्ल्ड कप-2023 मधील दोन अंतिम फेरीतील संघ निश्चित झाले आहेत. 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताचा सामना पाच वेळा विजेत्या ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.

भारताने न्यूझीलंडचा पराभव केला तर गुरुवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना खूपच रोमांचक झाला. अथक परिश्रमानंतर ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकला.

या उपांत्य फेरीच्या सामन्यांसोबतच एका स्टार खेळाडूचे वनडे करिअर संपले आहे. या खेळाडूने टूर्नामेंट सुरू होण्यापूर्वीच घोषणा केले होते की, तो 2023 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपनंतर एकदिवसीय क्रिकेट खेळणार नाही.

Quinton de Kock
SA Vs AUS : ऑस्ट्रेलियाने दक्षिण अफ्रिकेची झुंज काढली मोडून, 3 विकेट्सनी पराभव करत गाठली फायनल

वर्ल्ड कप 2023 चा दुसरा सेमीफायनल सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवासह दक्षिण आफ्रिकेचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकची वनडे कारकीर्दही संपुष्टात आली आहे. क्विंटन डी कॉकने आधीच घोषणा केले होते की, तो 2023 च्या वर्ल्ड कपनंतर एकदिवसीय क्रिकेट खेळणार नाही. अशा परिस्थितीत तो यापुढे वनडे फॉरमॅटमध्ये खेळताना दिसणार नाही. मात्र, डी कॉक टी-20 क्रिकेट खेळत राहणार आहे.

Quinton de Kock
World Cup 2023: ऑस्ट्रेलिया नवव्यांदा खेळणार फायनल; जाणून घ्या किती फायनल्स खेळल्या अन् जिंकल्या?

क्विंटन डी कॉकने आपल्या कारकिर्दीत दक्षिण आफ्रिकेसाठी 155 एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 6770 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 21 शतके आणि 30 अर्धशतके केली आहेत.

क्विंटन डी कॉकने यापूर्वी 2021 मध्ये कसोटी फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली होती. डी कॉकने दक्षिण आफ्रिकेसाठी एकूण 54 कसोटी खेळल्या. या कालावधीत त्याने 38.82 च्या सरासरीने 3300 धावा केल्या. डी कॉकने कसोटी क्रिकेटमध्ये एकूण सहा शतके आणि 22 अर्धशतके झळकावली आहेत.

वर्ल्ड कप 2023 मध्ये अप्रतिम कामगिरी

क्विंटन डी कॉकसाठी 2023 चा वर्ल्ड कप खूप संस्मरणीय ठरला. यावर्षी त्याने स्पर्धेत 10 सामने खेळले आणि 59.40 च्या सरासरीने 594 धावा केल्या. या काळात त्याने 4 शतकी खेळीही खेळली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com