World Cup 2023 Semi Final Equation : वर्ल्ड कपमध्ये होणार भारत-पाकिस्तान सेमी-फायनल सामना? जाणून घ्या समीकरण

World Cup 2023 Semi Final Equation : वर्ल्ड कपमध्ये होणार भारत-पाकिस्तान सेमी-फायनल सामना? जाणून घ्या समीकरण

World Cup 2023 Semi Final Equation : आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2023 मधील उपांत्य फेरीची शर्यत खूपच मनोरंजक बनली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका या संघांनी उपांत्य फेरीतील आपले स्थान आधीच पक्के केले आहे. तर बांगलादेश आणि गतविजेता इंग्लंड शर्यतीतून पूर्णपणे बाहेर आहेत. ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, न्यूझीलंड, श्रीलंका, नेदरलँड आणि अफगाणिस्तान या उर्वरित सहा संघामध्ये दोन जागीसाठी चुरशीची लढत पाहिला मिळत आहे.

World Cup 2023 Semi Final Equation : वर्ल्ड कपमध्ये होणार भारत-पाकिस्तान सेमी-फायनल सामना? जाणून घ्या समीकरण
Virat Kohli Birthday: वर्ल्डकप फिव्हर! 'बर्थडे बॉय' कोहलीला केस कापतानाही आवरला नाही PAK Vs NZ मॅच पाहाण्याचा मोह

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील उपांत्य फेरीत काय होणार?

भारत आणि पाकिस्तान यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होऊ शकतो, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण होत आहे. काल पाकिस्तानने न्यूझीलंडचा पराभव केला होता, त्यानंतर या चर्चा जास्त रंगल्या.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना होऊ शकतो, फक्त भारत पहिल्या आणि पाकिस्तान चौथ्या क्रमांकावर असला पाहिजे. भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केल्यास ते अव्वल स्थानावर राहील याची खात्री आहे. तर पाकिस्तान चौथ्या क्रमांकावर राहूनच उपांत्य फेरीसाठी पात्र ठरू शकतो.

उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघाला प्रथम इंग्लंडचा पराभव करावा लागेल. तसेच, न्यूझीलंड श्रीलंकेकडून हरेल याची प्रार्थना करावी लागेल. यासह अफगाणिस्तानने आपले उर्वरित दोन सामने गमावले. तरच पाकिस्तान 10 गुणांसह पात्र ठरू शकेल.

World Cup 2023 Semi Final Equation : वर्ल्ड कपमध्ये होणार भारत-पाकिस्तान सेमी-फायनल सामना? जाणून घ्या समीकरण
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताच्या प्लेइंग-11 मध्ये होणार मोठा बदल? 'या' खेळाडूला मिळणार संधी

पाकिस्तानचा नेट रन रेट सध्या न्यूझीलंडपेक्षा कमी आहे. न्यूझीलंडने श्रीलंकेचा मोठ्या फरकाने पराभव केल्यास पाकिस्तानच्या अडचणी वाढतील. उदाहरणार्थ, जर न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्ध 50 धावांनी विजय मिळवला, तर पाकिस्तानला नेट-रन-रेटमध्ये न्यूझीलंडला मागे टाकण्यासाठी इंग्लंडला 180 धावांनी पराभूत करावे लागेल. जर समीकरण जुळले तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना 16 नोव्हेंबरला कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com