World Cup 2023 Semi Final Scenario : भारताशिवाय 'या' संघाची जागा निश्चित! सेमी फायनलसाठी २ जागेसाठी ६ संघामध्ये चुरशीची लढत

World Cup 2023 Semi Final Scenario : भारताशिवाय 'या' संघाची जागा निश्चित! सेमी फायनलसाठी २ जागेसाठी ६  संघामध्ये चुरशीची लढत
Updated on

World Cup 2023 Semi Final Scenario : टीम इंडिया वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचणार हे निश्चित आहे. भारताने आपले सर्व 6 सामने जिंकले असून गुणतालिकेत 12 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. तर दूसरा दक्षिण आफ्रिकाही उपांत्य फेरी गाठणार हे जवळपास निश्चित झाले आहे. 6 पैकी 5 सामने जिंकून तो दुसऱ्या स्थानावर आहे.

वर्ल्ड कप 2023 च्या गुणतालिकेत न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. दोघांच्या खात्यात 6 सामन्यांतून 8-8 गुण आहेत. या दोन्ही संघांनी उर्वरित ३ सामने जिंकल्यास उपांत्य फेरी गाठणे निश्चित आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया कमाल 14 गुणांपर्यंत पोहोचू शकतात.

असे झाल्यास उर्वरित ४ संघ (पाकिस्तान, श्रीलंका, नेदरलँड, अफगाणिस्तान) बाहेर होतील. इंग्लंड आणि बांगलादेशचे संघ गुणतालिकेत 9व्या आणि 10व्या स्थानावर आहेत. दोघांचे 6 सामन्यांत समान 2 गुण आहेत. दोघांनी आपापले पाच सामने गमावले आहेत. जरी दोन्ही संघांनी त्यांचे सर्व सामने जिंकले तरी ते जास्तीत जास्त 8 गुणांपर्यंतच पोहोचतील, जे उपांत्य फेरी गाठण्यासाठी अपुरे आहेत.

पाकिस्तान, श्रीलंका, नेदरलँड आणि अफगाणिस्तान या संघांबद्दल बोलायचे झाले तर त्यांची अवस्था स्पर्धेत खूपच वाईट आहे. या 4 संघांचे समान 4 गुण आहेत. पाकिस्तान आणि नेदरलँड्स 6-6 सामने खेळले आहेत तर श्रीलंका आणि अफगाणिस्तानने आतापर्यंत 5-5 सामने खेळले आहेत. सोमवारी पुण्यात दोघांमध्ये टक्कर होणार असून, हा सामना जिंकणाऱ्या संघाला 6 गुण मिळतील.

अफगाणिस्तानसाठी पुढचा मार्ग थोडा कठीण असेल. त्यांना नेदरलँड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामने खेळायचे आहेत. नेदरलँड संघाने या वर्ल्ड कपमध्ये दोन अपसेट केले आहेत. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकाही विजयाच्या रथावर स्वार होत आहेत. अशा स्थितीत अफगाणिस्तानसाठी उपांत्य फेरीचा मार्ग निश्चित करणे सोपे नाही.

त्याचबरोबर श्रीलंकेला पुढील तीन सामन्यांमध्ये भारत, बांगलादेश आणि न्यूझीलंडचा सामना करायचा आहे. बांगलादेशला पराभूत करणे त्यांच्यासाठी सोपे असेल, पण भारत आणि न्यूझीलंड या वर्ल्ड कपमध्ये चमकदार कामगिरी करत आहेत. श्रीलंकेचा संघ दोन सामने हरला तर उपांत्य फेरी गाठणे त्यांच्यासाठी कठीण आहे.

उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा कायम ठेवण्यासाठी श्रीलंका आणि अफगाणिस्तानला आपले सामने जिंकणे आवश्यक आहे. त्याचबरोबर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियातील एक संघ दोन सामने हरला पाहिजे, अशी प्रार्थनाही करावी लागेल. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड जास्तीत जास्त 10 गुणांपर्यंत पोहोचू शकतील.

जर 9 सामन्यांनंतर संघांचे समान गुण असतील तर ज्या संघाचा नेट रनरेट चांगला असेल तो उपांत्य फेरीत पोहोचेल. सध्या पाकिस्तान, श्रीलंका, नेदरलँड आणि अफगाणिस्तानचा नेट रन रेट मायनसमध्ये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com