वर्ल्ड कप फुटबॉलच्या फीव्हरमध्ये कबड्डीची चढाई

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 जून 2018

मुंबई - चार महिन्यांनी होणाऱ्या प्रो-कबड्डीच्या सहाव्या मोसमासाठीचा लिलाव पार पडला असतानाच कबड्डीप्रेमींसाठी या महिन्याअखेर पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेची मेजवानी मिळणार आहे. दुबईत सहा देशांमध्ये ही स्पर्धा होत असून, त्यात पाकिस्तानचाही समावेश आहे. २२ ते ३० जून असा कालावधी आहे.

संपूर्ण क्रीडाविश्‍वाचे लक्ष लागून राहिलेली विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धा १४ जूनपासून रशियात सुरू होत आहे. एक महिना चालणाऱ्या या स्पर्धेची उत्सुकता वाढलेली असतानाच सहा देशांची कबड्डी स्पर्धा नऊ दिवस रंगणार आहे. आशियाई स्पर्धेच्या तयारीची संधी मिळावी म्हणून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भारत, पाक यांच्यासह इराण, बांगलादेश, दक्षिण कोरिया, मलेशिया यांचा समावेश आहे. 

संघ - अजय ठाकूर (हिमाचल प्रदेश), राहुल चौधरी (उत्तर प्रदेश), प्रदीप नरवाल (उत्तराखंड), रिशांक देवाडिगा, गिरीश इरनाक (महाराष्ट्र), सुरिंदर नाडा, संदीप नरवाल (हरियाना), मोहित चिल्लर, मनजित चिल्लर (रेल्वे), मोनू गोयत, रोहित कुमार, सुरजीत (सेनादल), दीपक हुडा, राजू लाल चौधरी (राजस्थान).

भारतीय संघात महाराष्ट्राचे दोन खेळाडू
भारताच्या संघात राष्ट्रीय विजेत्या महाराष्ट्राच्या रिशांक देवाडिगा आणि गिरीश इरनाक यांची निवड झाली. यापूर्वी आशियाई स्पर्धेसाठी नितीन मदने, त्यानंतर सॅफ गेम्ससाठी विशाल माने संघात होते. विश्‍वकरंडक, आशियाई स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा एकही खेळाडू संघात नव्हता.

Web Title: world cup footballa kabaddi