आघाडीनंतरही पोर्तुगालची बरोबरी वर्ल्डकप सराव सामने 

वृत्तसंस्था
बुधवार, 30 मे 2018

सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या अनुपस्थितीत विश्‍वकरंडक फुटबॉल सरावासाठी खेळलेल्या मित्रत्वाच्या सामन्यात पोर्तुगालला 2-0 आघाडी घेऊनही ट्युनिशियाविरुद्ध बरोबरीवर समाधान मानावे लागले. पोर्तुगाल हे युरोपियन विजेते असून, विश्‍वकरंडक स्पर्धेत त्यांच्या गटात बलाढ्य स्पेनचा समावेश आहे. 

वोल्गोगार्ड - सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या अनुपस्थितीत विश्‍वकरंडक फुटबॉल सरावासाठी खेळलेल्या मित्रत्वाच्या सामन्यात पोर्तुगालला 2-0 आघाडी घेऊनही ट्युनिशियाविरुद्ध बरोबरीवर समाधान मानावे लागले. पोर्तुगाल हे युरोपियन विजेते असून, विश्‍वकरंडक स्पर्धेत त्यांच्या गटात बलाढ्य स्पेनचा समावेश आहे. 

दोन दिवसांपूर्वीच चॅंपियन्स लीगच्या अंतिम सामन्यात खेळल्यामुळे रोनाल्डोने ट्युनिशियाविरुद्धच्या या सामन्यातून विश्रांती घेतली; पण त्याच्या सहकाऱ्यांना चांगला खेळ करूनही विजय मिळवता आला नाही. वालेंटे सिल्वाने 20 यार्डावरून गोल करून पोर्तुगालचे खाते उघडले; पण ऍनिस बद्रीने ट्युनिशियाला बरोबरी साधून दिली. 

जोओ मारिओने गोल करून पुन्हा पोर्तुगालचे एक पाऊल पुढे ठेवले; परंतु उत्तरार्धात बेन योसेफने गोल करून पोर्तुगालच्या विजयाच्या आशांवर पाणी फेरले. 

फ्रान्सचा विजय 
माजी विजेत्या फ्रान्सने रिपब्लिक ऑफ आयर्लंडविरुद्ध 2-0 विजय मिळवला. दोन्ही गोल पूर्वार्धात चार मिनिटांत करण्यात आले. गेरॉल्डने फ्रान्सकडून खेळताना आपला 31 वा गोल केला. त्यानंतर नबील फेक्रीने सामन्यातला दुसरा गोल टोलावला. फ्रान्सचे आता इटली आणि अमेरिकेविरुद्धचे सराव सामने शिल्लक आहेत. 

बालोटेलीचा गोल 
यंदाच्या विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी इटली पात्र ठरलेले नसले तरी त्यांनी सौदी अरेबियाविरुद्धच्या सामन्यात 2-1 अशी बाजी मारली. चार वर्षांनंतर पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या बालोटेलीने शानदार पुनरागमन करताना सामन्याच्या 21 व्या मिनिटालाच गोल केला. इटलीचा दुसरा गोल बेलोट्टीने केला. सौदीकडून एकमेव गोल अल शेहरीने

इतर निकाल 
अमेरिका वि. वि. बोलिविया 3-0, दक्षिण कोरिया वि. वि. होंडुरास 2-0, तुर्कस्तान वि. वि. इराण 2-1, नायजेरिया बरोबरी. वि. डीआर कांगो 1-1. 

Web Title: World Cup practice matches