

World Padel League Season 4
Sakal
World Padel League Season 4: वर्ल्ड पॅडेल लीगचा चौथा हंगाम अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असून, पुढील पाच दिवस मुंबईत रंगणाऱ्या या अत्यंत चुरशीच्या स्पर्धेकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. 'डोम, एसव्हीपी स्टेडियम' (DOME, SVP Stadium) येथे होणाऱ्या या स्पर्धेत या खेळातील काही अव्वल खेळाडूंचा समावेश असलेले ६ संघ सहभागी होत आहेत.
या चौथ्या हंगामात प्रीमियर पॅडेल चॅम्पियन्स, जगातील अव्वल २० मधील अनेक खेळाडू आणि माजी जागतिक क्रमवारीतील प्रथम क्रमांकाचे खेळाडू ६ संघांमधून मैदानात उतरतील.