Haney breaks world record with 60.49m throw at Asian Para Games 2026
esakal
Haney and Sandeep create world records as India win gold medals: भारतीय खेळाडूंनी आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये शुक्रवारी सकाळच्या सत्रात आतापर्यंत ५ सुवर्णपदकं जिंकली आहेत. हॅनी व संदीप यांनी आपापल्या गटात विश्वविक्रमाची नोंद करताना भारतीयांचा दिवस संस्मरणीय केला. या दोन सुवर्णपदकांमुळे भारताने पदकांचे शतक पूर्ण केले. भारत २६ सुवर्ण, ३३ रौप्य व ४३ कांस्य अशा एकूण १०२ पदकांसह तालिकेतक चौथ्या क्रमांकावर आहे. चीनने सर्वाधिक ३४५ पदकं जिंकली आहेत आणि त्यात १६५ सुवर्णपदकांचा समावेश आहे. जपान ( १४८) व उझबेकिस्तान ( १२६) हे भारताच्या पुढे आहेत.