World Relay Competition : भारतीय रिले संघाचा लागणार कस

पॅरिस ऑलिंपिकसाठी रिलेचे तिकीट पक्के करण्यासाठी भारताच्या रिले संघाला पूर्ण ताकद लावावी लागणार आहे.
World Relay Competition
World Relay Competitionsakal

नौसाऊ - पॅरिस ऑलिंपिकसाठी रिलेचे तिकीट पक्के करण्यासाठी भारताच्या रिले संघाला पूर्ण ताकद लावावी लागणार आहे. कारण उद्यापासून बहामा येथे सुरू होत असलेल्या दोन दिवसीय जागतिक रिले स्पर्धेतून अव्वल १४ संघ थेट पॅरिससाठी पात्र ठरणार आहेत. भारतीय संघ पुरुष व महिलांच्या ४-४०० मीटर तसेच मिश्र ४-४०० मीटर रिले शर्यतीत सहभागी होत आहे.

भारतीय संघाला सर्वाधिक आशा पुरुषांच्या ४-४०० रिले संघाकडून आहे. यात अमोल जेकब, आरोक्य राजीव, राजेश रमेश, नोह निर्मल टोम, महम्मद अजमल, महम्मद अनस, अविनाश कुमार आणि यशास यांचा समावेश आहे. गेल्यावर्षी बुडापेस्ट येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत अनस, अमोल जेकब, अजमल व राजेश रमेश या चौकडीने २ मिनीटे ५९.०५ सेकंदाचा नवीन आशियाई व राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करताना अंतिम फेरी गाठली होती.

अंतिम फेरीत भारतीय संघाला पाचव्या स्थानावर समाधन मानावे लागले होते. सध्या भारतीय संघाची मोसमातील सर्वोत्तम वेळ ३ मिनीट ०५.७१ सेकंद अशी आहे. त्यामुळे या संघाला सर्वस्व पणाला लावावे लागेल. कारण पहिल्या दिवशी ३२ संघ प्राथमिक फेरीत उतरतील.

एकूण चार हीट (प्राथमिक फेरी) होतील व प्रत्येक हीटमधील अव्वल दोन संघ दुसऱ्या दिवशी होणाऱ्या अंतिम फेरीसाठी व पॅरीससाठीही पात्र ठरतील. पहिल्या दिवशी पात्र ठरू न शकलेले २४ संघ दुसऱ्या दिवशी पुन्हा तीन हीटमध्ये सहभागी होतील व त्यातील अव्वल दोन संघ अशा प्रकारे एकूण १४ संघ पॅरिससाठी पात्र ठरतील. अशी प्रक्रिया पाचही रिले शर्यतीसाठी होईल.

पुरुषांच्या ४-४०० मीटर शर्यतीत ऑलिंपिक विजेता स्टिव्हन गार्डनरचा समावेश असलेला यजमान बहामा, जागतिक इनडोअर स्पर्धेतील विजेता असलेला अलेक्झांडर डूमचा समावेश असलेला बेल्जियम, बोट्सवाना, फ्रान्स, अमेरिका, पोलंड हे संघ पदकाचे दावेदार आहेत. महिलांच्या ४-४०० रिले शर्यतीत विश्वविजेते नेदरलँड प्रबळ दावेदार असून त्यांची मदार फेमके बोल वर आहे.

याशिवाय पोलंड, अमेरिका, जमैका, कॅनडा, नायजेरिया यांच्यातही चुरस आहे. भारतीय संघालाही पसंती मिळाली असून त्यात ज्योतिका, अनुभवी पूवम्मा, महाराष्ट्राची ऐश्वर्या मिश्रा, प्राची, आशियाई क्रीडा स्पर्धेत मिश्र रिलेत सुवर्णपदक जिंकणारी वित्या रामराज, सुबा वेंकटेशन आणि जागतिक ज्युनिअर स्पर्धेतील ब्राँझपदक विजेती रूपल चौधरी यांचा समावेश आहे. मिश्र रिले शर्यतीतही भारतीय संघाला अंतिम १४ संघात स्थान मिळवून पॅरिसचे तिकीट पक्के करण्याची संधी आहे.

एकूण खेळाडू ८९३

सहभागी देश ५४

पुरुष

४-१०० मीटर - ३२ संघ

४-४०० मीटर - ३२ संघ

महिला

४-१०० मीटर - ३० संघ

४-४०० मीटर - २७ संघ

मिश्र

४-४०० मीटर - ३० संघ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com