जागतिक टेनिस क्रमवारीत अँडी मरेचे अव्वल स्थान कायम

पीटीआय
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

लंडन - ब्रिटनच्या अँडी मरे याने पुरुष एकेरीतील जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थान कायम राखले. मंगळवारी नवी मानांकन यादी जाहीर केली. मरे गेल्या वर्षी ७ नोव्हेंबर रोजी सर्वप्रथम अव्वल स्थानावर आला होता. तेव्हापासून त्याने अव्वल स्थान राखले आहे. सर्बियाचा नोव्हाक जोकोविच दुसऱ्या आणि स्वित्झर्लंडचा स्टॅन वाव्रींका तिसऱ्या स्तानावर आहे. बेल्जियमच्या डेव्हिड गॉफिनचे स्थान एकने उंचावले असून, तो प्रथमच पहिल्या दहांत आला आहे. मिलोस राओनिच चौथ्या, केई निशिकोरी पाचव्या आणि रॅफन नदाल सहाव्या स्थानावर आहे. मोसमातील पहिली ऑस्ट्रेलियन ग्रॅंड स्लॅम जिंकणारा फेडरर मात्र नवव्या स्थानावर आहे. 

Web Title: World tennis number one Andy marece permanent top