

World Yogasana Championship 2026 India
Sakal
एका अरेना येथे सुरू असलेल्या पहिल्या विश्व योगासन अजिंक्यपद स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी यजमान भारताने आपली सुवर्णपदकांची संख्या २२ पर्यंत वाढवली. याचबरोबर नेपाळ, जपान आणि अमेरिका यांनी प्रत्येकी एक सुवर्णपदक जिंकत आपली छाप पाडली.
भारताने सलग तिसऱ्या दिवशीही वर्चस्व राखले असून विविध वयोगटांतील जवळपास सर्वच प्रकारांमध्ये पदकांची कमाई केली. भारताच्या खात्यात तिसऱ्या दिवसापर्यंत २२ सुवर्ण, ५ रौप्य आणि १ कांस्य पदक जमा झाले होते.