विश्‍वकरंडक तिरंदाजीत ब्राँझ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 एप्रिल 2018

शांघाय - अभिषेक वर्मा आणि सुरेखा वेनमन यांनी तुर्कस्थानचे आव्हान मोडून विश्‍वकरंडक तिरंदाजी स्पर्धेत कम्पाउंडच्या मिश्र गटात ब्राँझपदकाची कमाई केली. भारताच्या या जोडीने तुर्कस्थानच्या येसिम बोस्तन आणि डेमीर एलमागचली यांचा १५४-१४८ असा पराभव केला.

वर्माचे हे यश विश्‍वकरंडक स्पर्धेतील सातवे यश आहे. तसेच २०१७ पासूनचे भारताचे कम्पाउंडमधील दुसरे ब्राँझ आहे. अंताल्या येथे गतवर्षी झालेल्या स्पर्धेत वर्माने १५ वर्षीय दिव्या दयाळसह ब्राँझपदक जिंकले होते. याच स्पर्धेत पुरुषांच्या कम्पाउंडमध्ये त्याने भारताचे पहिले सुवर्णपदक मिळवले होते. तसेच मेक्‍सिको येथे २०१५ मध्ये झालेल्या विश्‍वकरंडक स्पर्धेत वैयक्तिक गटात त्याने रौप्यपदकाची कमाई केली होती. त्या वर्षी पोलंड येथील विश्‍व स्पर्धेत याच गटात सुवर्णपदक जिंकले होते.

पहिल्या टप्प्यात भारताने ३९-३५ अशी आघाडी घेतली होती. यामध्ये वर्माने दोनदा १० गुण मिळवले होते. दुसऱ्या टप्प्यात हीच आघाडी ७८-७३ अशी झाली. वर्माने चार प्रयत्नांत मिळून ३९ गुणांपर्यंत मजल मारली. तिसऱ्या टप्प्यात दोन्ही देशांनी ३७ गुण मिळवले; परंतु भारताकडे एकूण पाच गुणांची आघाडी होती.

Web Title: worldcup archery bronze medal abhishek varma surekha wenman