DC vs MI WPL 2023 Final : फायनलचा थरार! कधी, कुठे अन् कसा पाहायचा हे जाणून घ्या?

WPL 2023 final Delhi Capitals vs Mumbai Indians
WPL 2023 final Delhi Capitals vs Mumbai Indians

WPL 2023 final Delhi Capitals vs Mumbai Indians : महिला प्रीमियर लीग २०२३चा प्रवास आता शेवटच्या टप्प्यावर पोहोचला आहे. रविवारी लीगला पहिला चॅम्पियन मिळेल. या विजेतेपदासाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सचे संघ आमनेसामने असतील.

या दोन्ही संघांनी साखळी फेरीतील ८ पैकी ६-६ सामने जिंकले. दिल्लीचा नेट रनरेट चांगला होता आणि त्यामुळेच त्यांना थेट फायनलमध्ये प्रवेश मिळाला. दुसरीकडे मुंबई इंडियन्सने एलिमिनेटर सामन्यात यूपी वॉरियर्सचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.

हे दोन्ही संघ साखळी फेरीत दोनदा आमनेसामने आले आहेत. प्रथमच दोन्ही संघ ९ मार्चला आमनेसामने आले होते. या सामन्यात मुंबईने ९ गडी राखून विजय मिळवला. आणि २० मार्च रोजी दोन्ही संघ पुन्हा आमनेसामने आले आणि यावेळी दिल्ली कॅपिटल्सने ९ गडी राखून विजय मिळवला.

WPL 2023 final Delhi Capitals vs Mumbai Indians
Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह वर्ल्डकपमधून बाहेर? एक चुकीचा निर्णय अन् कारकीर्द संपली

महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील अंतिम सामना कधी, किती वाजता,कोठे खेळला जाईल?

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील अंतिम सामना रविवार २६ मार्चला संध्याकाळी 7.30 वाजता मुंबईच्या ब्रेबॉन स्टेडियमवर खेळल्या जाईल.

महिला प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण कोठे केले जाईल?

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 चॅनलवर होणार आहे.(WPL 2023 final Delhi Capitals vs Mumbai Indians)

WPL 2023 final Delhi Capitals vs Mumbai Indians
IPL 2023 Video: 'क्रिकेटर्स अभिनय क्षेत्रात घुसले मग राडा तर होणारच...' 3 इडियट्सचा व्हिडिओ व्हायरल

नॅट सिव्हर हिची अष्टपैलू चमक (नाबाद ७२ धावा व १/२१) आणि इसाबेल वॉग हिने हॅट्ट्रिकसह टिपलेले चार बळी याच जोरावर मुंबई इंडियन्सने शुक्रवारी नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या एलिमिनेटर लढतीत यूपी वॉरियर्सवर ७२ धावांनी विजय मिळवला आणि महिला प्रीमियर लीग या टी-२० स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

मुंबईकडून यूपी वॉरियर्ससमोर १८३ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. मात्र त्यांचा डाव १७.४ पटकांत ११० धावांमध्येच गारद झाला. इसाबेल वांग हिने १३व्या षटकांतील दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या चेंडूवर किरण नवगिरे, सिमरन शेख व सोफी एक्लेस्टोन यांना बाद करीत हॅट्रिक साजरी केली. तिने १५ धावा देत ४ फलंदाज बाद केले. यूपी वॉरियर्सकडून किरण नवगिरे हिने सर्वाधिक ४३ धावा केल्या.

WPL 2023 final Delhi Capitals vs Mumbai Indians
AFG vs PAK 1st T20 : बदला! अफगाणिस्तानने रचला इतिहास; बाबर-रिजवान शिवाय पाकिस्तानचे हाल

दरम्यान, याआधी यूपी वॉरियर्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. यास्तिका भाटीया व हेली मॅथ्यूज या मुंबईच्या सलामी जोडीने ३१ धावांची भागीदारी करीत आश्वासक सुरुवात करून दिली. अंजली सरवानी हिने यास्तिकाला २१ धावांवर बाद केले. त्यानंतर मॅथ्यूज व नॅट सिव्हर ही जोडी खेळपट्टीवर स्थिरावणार असे वाटत असतानाच पार्श्ववी चोप्रा हिने मॅथ्यूजला २६ धावांवर बाद केले. कर्णधार हरमनप्रीत कौरलाही मोठी खेळी करता आली नाही. सोफी एक्लेस्टोन हिने तिला १४ धावांवर बाद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com