Virat Kohli Gets Emotional After RCB Women’s Historic Title Win
esakal
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या महिला संघाने इतिहास घडवला आहे. गुरुवारी झालेल्या वूमन्स प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सवर ६ विकेट्सने मात केली. या विजयासह आरसीबीने दुसऱ्यांदा ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. यापूर्वी २०२४ मध्येही बंगळुरूने विजेतेपद पटकावले होते. आता पुन्हा एकदा हा किताब जिंकत संघाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या विजयानंतर महिला संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे, विराट कोहलीनेही या विजयानंतर संघाचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.