
Smriti Mandhana RCB : 18 चं गणित जुळवलंच! ग्लॅमरचा तडका द्यावा तर आरसीबीनेच
Smriti Mandhana RCB WPL Auction : वुमन्स प्रीमियर लीग 2023 च्या मेगा लिलावात रॉयल चॅलेंजर बेंगलोरने सुरूवातीलाच स्मृती मानधनाला 3.40 कोटी रूपये बोली लावत आपल्या गोटात खेचले. स्मृतीसाठी मुंबई इंडियन्सने देखील आक्रमक बोली लावली होती. मात्र आरसीबीने आपली 18 क्रमांकाची जर्सी सर्वोच्च बोली लावत आपल्याकडेच राखण्यात यश मिळवले.
विशेष म्हणजे आरसीबीने यंदाच्या लिलावात आक्रमक बोली तर लावलीच याचबरोबर त्यांनी योगायोग देखील घडवले. विराट कोहली हा आयपीएलमधील आरसीबीचा चेहरा राहिला आहे. त्याचा जर्सी क्रमांक 18 आहे. तर आता WPL मध्ये देखील त्यांच्याकडे 18 नंबर जर्सी असणार आहे. स्मृती मानधना देखील 18 नंबरचीच जर्सी घालते. याचबरोबर हे दोघेही क्रिकेट वर्तुळातील एक ग्लॅमरस आयकॉन म्हणून गणले जातात. आरसीबीने संघ बांधणीसोबतच ग्लॅमरस तडका देण्याचा आपला हातखंडा कायम राखला आहे.
आरसीबीने सर्वोच्च बोली लावण्याची आपली सवय WPL मध्ये देखील बदलेली नाही. त्यांनी स्मृतीला सर्वोच्च बोली लावली. याचबरोबर अॅलेस पेरी, रेणुका सिंह सोफी डिवाईन यासारख्या बिग शॉट प्लेअर्सना देखील आपल्या गोटात खेचले. याचबरोबर त्यांनी भारताची धडाकेबाज फलंदाज रिचा घोषाला आरसीबीने 1.90 कोटी रूपयायाला खरेदी करत आपल्या संघाची फॉयर पॉवर वाढवली.
हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस