
WPL Auction 2023: कोण आहे मलिका आडवाणी? हिच्याच हातात असणार WPL लिलावाचा हातोडा
WPL Auction 2023 Who is Malika Advani : महिला प्रीमियर लीग (WPL) साठी खेळाडूंचा लिलाव आज मुंबईत होणार आहे. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये दुपारी अडीच वाजता लिलाव सुरू होणार आहे.
यासाठी ऐतिहासिक पाऊल उचलत बीसीसीआयने एका महिलाची ऑक्शनसाठी निवड केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार बोर्डाने मुंबईच्या मलिका अडवाणीची या जबाबदारीसाठी निवड केली आहे.
बीसीसीआयच्या आयपीएल लिलावात तीन जणांनी लिलाव करणाऱ्यांची भूमिका बजावली आहे. लिलावात प्रथम रिचर्ड मॅडलीचा आवाज आला. त्यांच्यानंतर ह्यू अॅडम्स यांना ही जबाबदारी मिळाली.
गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये लिलावादरम्यान तो स्टेजवरून अचानक कोसळला होता. त्यांच्या जागी चारू शर्माने लिलाव करून घेतला. एडमंड्स नंतर परत आला आणि लिलाव पूर्ण केला.
कोण आहे मलिका अडवाणी?
बीसीसीआयने आयोजित केलेल्या लिलावाची ही पहिलीच वेळ असेल ज्याची जबाबदारी एक महिला असेल. मलिका अडवाणी ही मुंबईची रहिवासी आहे. ती मुंबईस्थित आर्ट कलेक्टर सल्लागार आणि आर्ट इंडिया कन्सल्टंट्स या फर्ममध्ये भागीदार म्हणून काम करते.