Wrestlers Protest : दुर्लक्ष केलं... बृजभूषण प्रकरणात मेरी कोम अडकणार वादाच्या भोवऱ्यात?

Wrester Protest Mary kom
Wrester Protest Mary komesakal

Wrester Protest Mary kom : कुस्ती महासंघाचे विद्यमान अध्यक्ष आणि भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरूद्ध महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी चार्चशीट दाखल केली आहे. दिल्ली कोर्टाने बृजभूषण शरण सिंह यांना समन्स देखील बजावला आहे. या सर्व घडामोडी महिला कुस्तीपटूंनी दिल्ली पोलिसांकडे एफआयआर दाखल केल्यानंतर झाल्या.

याच महिला कुस्तीपटूंनी फेब्रुवारी महिन्यात मेरी कोम यांच्या नेतृत्वातील देखरेख समितीसमोर देखील आपली व्यथा मांडली होती. मात्र यानंतर कोणतीही कारवाई झाली नाही.

Wrester Protest Mary kom
Team India Jersey : देख रहा हैं ना बिनोद... टीम इंडियाची टेस्ट जर्सी बदलली अन् चाहत्यांचे डोळे फिरले

देखरेख समिती राहिली गप्प

जानेवारी महिन्यात बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगाट यांच्यासह काही कुस्तीपटूंनी आंदोलन सुरू केले होते. त्यावेळी क्रीडा मंत्रालयाने बृजभूषण शरण सिंह यांच्याविरूद्ध चौकशी करण्यासाठी एक देखरेख समिती स्थापन केली होती.

या समितीची अध्यक्ष सहा ऑलिम्पिक पदक विजेती मेरी कॉम करत होती. या समितीत कुस्तीपटू योगेश्वर दत्त, बबिता फोगाट, तृप्ती मुरगंडे, स्पोर्ट्स अथोरिटी ऑफ इंडियाचे माजी संचालक राधिका श्रीमन, टॉप्सचे माजी प्रमुख कार्यकारी संचालक राजेश राजगोपलन देखील समील होते.

Wrester Protest Mary kom
Ajinkya Rahane WI vs IND : या वयात म्हणजे.. 'पत्रकार' रोहितने रहाणेची घेतली फिरकी

कुस्तीपटूंच्या आरोपांना दिलं नाही महत्व

महिला कुस्तीपटूंनी आपल्या तक्रारी या समितीकडे केल्या होत्या. या समितीतील एकाही व्यक्तीने या तक्रारी खोट्या असल्याचे म्हटले नाही. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार या समितीने बृजभूषण यांच्याविरूद्ध कोणतेही आरोप केले नाही.

कुस्ती फेडरेशनमध्ये तक्रार निवारण समिती नसल्याचा उल्लेख देखरेख समितीच्या अहवालात होता. मात्र बृजभूषण यांच्याबद्दल काहीही नमुद करण्यात आले नाही. जवळपास एक डझन खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ यांनी भाजप खासदाराविरूद्ध वक्तव्य केली होती.

या समितीने अहवालात एकप्रकारे बृजभूषण यांना क्लीन चीट दिल्याने कुस्तीपटूंनी जंतर - मंतरवर आंदोलन केले.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com