बजरंग, रवी दहियाचा ब्रॉंझ पदकाचा दिलासा

बजरंग पुनिया
बजरंग पुनिया

मुंबई : जागतिक कुस्ती स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराजित झालेल्या बजरंग पुनिया आणि रवी दहियाने ब्रॉंझ पदकाचा दिलासा दिला. दोघांनीही उपांत्य फेरीतील पराभवातून सावरत हे यश मिळवले.

बजरंगला 65 किलो गटात अव्वल मानांकित होते. तो ब्रॉंझ पदकाच्या लढतीत चौथ्या मानांकित तुल्गा तुमुरविरुद्ध पहिल्या डावात 2-6 मागे पडला, पण त्यातून सावरत त्याने 8-7 असा विजय मिळवला. हे त्याचे जागतिक स्पर्धेतील तिसरे पदक आहे. ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय कुस्तीगीर ठरला आहे. त्याने यापूर्वी 2013 तसेच 2018 च्या स्पर्धेत पदक जिंकले होते.

बजरंगची सुरुवात खराब होती, तो सुरुवातीस 0-6 असा मागे पडला. या वेळी बजरंगला एकदा प्रतिस्पर्ध्याने छातीवरून फेकले होते; पण पहिला डाव संपताना दोन गुण जिंकत बजरंगने प्रतिकार सुरू केला होता. दुसऱ्या डावात बजंरगने तीनदा प्रतिस्पर्ध्यास पायात पाय घालून पाडले आणि 8-6 आघाडी घेतली आणि अखेर विजय संपादला.

रवीची सुरुवात चांगली होती. त्याने रेझा अहमदाली ऍत्रिनागचार्चीविरुद्धची लढत 6-3 अशी जिंकली. त्याने चांगला प्रतिहल्ला करीत 2-0 आघाडी विश्रांतीस घेतली. त्याने उत्तरार्धात आक्रमणास प्रतिआक्रमणाने चांगले उत्तर दिले आणि आघाडी कायम राखली. रवीने सलग तिसऱ्या स्पर्धेत पदक जिंकले. यापूर्वी त्याने 2015 च्या जागतिक कुमार आणि 2018 च्या जागतिक युवा स्पर्धेत पदक पटकावले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com