Wrestler Protest : नव्या संसद भवनासमोर पहिलं आंदोलन! कुस्तीपटू भरवणार महिलांची महा पंचायत

Wrestler Protest women's Maha Panchayat
Wrestler Protest women's Maha Panchayat esakal
Updated on

Wrestler Protest women's Maha Panchayat In Front Of new Parliament : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधातील महिला कुस्तीपटूंचे आंदोलनाने आता वेगळे वळण घेतले आहे. बृजभूषण शरण सिंह यांच्या अटकेची मागणी करणाऱ्या पदक विजेत्या महिला कुस्तीपटूंना आता आपल्या आंदोलनाचा मोर्चा नव्या संसद भवनाच्या दिशेने वळवला आहे.

Wrestler Protest women's Maha Panchayat
MS Dhoni Hardik Pandya : महेंद्रसिंह धोनीचा द्वेष हा फक्त.... पहिल्या क्वालिफायरपूर्वी धोनीबद्दल पांड्या हे काय म्हणाला?

आंदोलक कुस्तीपटू विनेश फोगाट आणि साक्षी मलिक यांनी आज पत्रकारांना आपण न्या मिळावा यासाठी काय करणार याची माहिती दिली. विनेश म्हणाली, 'आमच्या सर्व खाप पंचायतींनी आणि मोठ्यांनी एक निर्णय घेतला आहे. 28 तारखेला नव्या संसद भवनाच्या समोर महिलांची महा पंचायत भरवण्याचा निर्णय घेतला आहे. या शांतीपूर्ण आंदोलनात युवा आणि सर्व इतर समर्थक मागे पाठिंबा देण्यासाठी उभे असतील. ते आमची ताकद बणण्याचा प्रयत्न करतील.'

Wrestler Protest women's Maha Panchayat
Virat Kohli : कोण प्रिन्स अन् कोण किंग? गिलला गोंजारत लखनौने विराटला डिवचले

विनेश पुढे म्हणाली की, ही महिलांची महापंचायत आहे त्यामुळे या आंदोलनाचे नेतृत्व महिला करणार आहे. आमच्या जेवढ्या मोठ्या माता आणि भगिनी आहेत. ज्या आम्हाला समर्थन देण्यासाठी आल्या आहेत. त्या सर्वांना यात सहभागी होण्याची आवाहन करते. हा आवाज उठला आहे तर तो दूरपर्यंत जायला हवा. आज जर आम्हाला न्याय मिळाला तर आम्ही येणाऱ्या पिढीला देखील हिम्मत देण्याचे काम आम्ही करू.'

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com