Wrestlers Protest : WFI च्या कार्यालयातही लैंगिक शोषण, 1500 पानी आरोपपत्राने बृजभूषण यांची झोप उडाली?

Wrestlers Protest Delhi Police Chargesheet
Wrestlers Protest Delhi Police Chargesheetesakal

Wrestlers Protest Delhi Police Chargesheet : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरूद्ध दिल्ली पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. सहा महिला कुस्तीपटूंनी केलेल्या एफआयआरनंतर दिल्ली पोलिसांनी बृजभूषण यांच्याविरूद्ध 1500 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात बृजभूषण यांच्यावर लैंगिक शोषण आणि स्टॉकिंगचे आरोप ठेवण्यात आले आहेत. या आरोपपत्रावर 22 जूनला सुनावणी होणार आहे.

Wrestlers Protest Delhi Police Chargesheet
Suresh Raina MS Dhoni CSK : धोनीने माझ्याकडून परवानगी घेतली अन्... रैनाने सांगितलं चेन्नईने कशी जिंकली फायनल?

आरोपपत्रामध्ये 22 जणांचे जबाब

या आरोपपत्रातील सहापैकी तीन तक्रारींबाबतचे व्हिडिओ देखील जोडण्यात आले आहेत. इतर आरोपांमध्ये फोटो पुरावा म्हणून सादर करण्यात आले आहेत. 70 ते 80 लोकांचे साक्षीदार म्हणून जबाब नोंदवले गेले. यातील 22 जणांचा जबाब हा आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आले आहेत. या 22 जबाबातील 12 ते 15 जबाब हे कुस्तीपटूंचेच आहेत.

यातील भारतीय कुस्ती महासंघासोबत काम केलेले तर काही काम करत असलेल्या कुस्तीपटूंचा समावेश आहे. कुस्तीपटूंव्यतिरिक्त यात प्रशिक्षक, पंच आणि स्पर्धेदरम्यान संघासोबत प्रवास करणाऱ्या इतर लोकांचाही समावेश आहे.

इंडियन एक्सप्रेसशी बोलाना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपपत्रात सर्व सहा महिलांच्या तक्रारी या वेगवेगळ्या ठेवण्यात आल्या आहे. प्रत्येक तक्रारीबाबचा व्हिडिओ, फोटो आणि कॉल रेकॉर्ड्स पुरावा म्हणून आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आले आहेत.

Wrestlers Protest Delhi Police Chargesheet
Ashes 2023 Joe Root : रूटने वर्ल्ड चॅम्पियन्सची पार लाज काढली; भारताची भंबेरी उडवणारा बोलँडही हतबल

फोटो आणि व्हिडिओ पुरावे

ज्या स्पर्धेदरम्यान लैंगिक शोषणचा आरोप बृजभूषण यांच्याविरूद्ध करण्यात आला आहे. त्या स्पर्धेतील पदक वितरण समारंभ, ग्रुप फोटो आणि इव्हेंट दरम्यानचे फोटो आरोपपत्रात आहेत. अनेक लोकांचे म्हणणे आहे की भारतीय कुस्ती महासंघाच्या कार्यालयात देखील महिलांचे लैंगिक शोषण झाले होते. या कार्यालयासंदर्भातील व्हिडिओ देखील आरोपपत्रात आहेत.

न्यायालय घेणार निर्णय

या आरोपपत्रातील आरोपांबरोबरच चार प्रकरणात 2012 ते 2018 दरम्यान, झालेले कॉल रेकॉर्ड्स देखील काढण्यात आले आहेत. कॉल रेकॉर्ड्सला न्यायालय हे तांत्रिक पुराव्यांच्या श्रेणीत ठेवते. याचबरोबर दिल्ली पोलीसांनी आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंघाची दखील मदत मागितली आहे. त्यांचा जबाब आला की तो आरोपपत्रात समाविष्ट करण्यात येईल. आता पुरावे आणि शिक्षा याबाबत निर्णय हा न्यायालय घेईल.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com