Wrestlers Protest: अल्पवयीन मुलीच्या पित्याने 'यु-टर्न' पण ब्रिजभूषणला फायदा नाहीच! काय म्हणतात कायदेतज्ञ?

BJP MP Brij Bhushan Singh
BJP MP Brij Bhushan SinghSakal

Wrestlers Protest Brij Bhushan Singh : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे खोटे आरोप लावल्याचा दावा करणाऱ्या अल्पवयीन कुस्तीपटूच्या वडिलांचा 'यू-टर्न' निर्णायक ठरणार नाही. एफआयआर नोंदवल्यानंतर हे प्रकरण दिल्ली पोलिसांकडे आहे आणि पोलिस त्यांचा तपास सुरू ठेवू शकतात, असे कायदेतज्ज्ञांचे मत आहे.

अल्पवयीन कुस्तीपटूच्या वडिलांनी गुरुवारी सांगितले होते की त्यांनी ब्रिजभूषण यांच्याविरुद्ध जाणूनबुजून लैंगिक छळाची खोटी तक्रार दाखल केली आहे कारण तो आपल्या मुलीवर झालेल्या अन्यायाबद्दल संतापला होता.

BJP MP Brij Bhushan Singh
Ind vs Aus : WTC फायनल हरली तर 'या' 3 खेळाडूंची कारकीर्द संपणार, रोहितचे कर्णधारपदही धोक्यात!

या आरोपांमुळे ब्रिजभूषण शरण सिंहला गेल्या सहा महिन्यांपासून काही भारतीय कुस्तीपटूंकडून सतत विरोध होत आहे. अल्पवयीन मुलीच्या तक्रारीच्या आधारे, ब्रिजभूषण विरुद्ध बाल लैंगिक अपराधांपासून संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी ज्येष्ठ वकील राकेश द्विवेदी यांनी सांगितले की, एफआयआर दाखल झाल्यामुळे वडिलांचे म्हणणे 'निर्णायक' नाही. हे प्रकरण आता दिल्ली पोलिसांकडे असून ते तपास करत आहेत. पोलिसांना अल्पवयीन मुलाच्या वडिलांचे म्हणणे स्वीकारण्यास बांधील नाही. फौजदारी प्रक्रिया संहिताच्या कलम 164 अंतर्गत अल्पवयीन व्यक्तीचे बयान आधीच नोंदवले गेले असल्याने ती चौकशी सुरू ठेवू शकते.

BJP MP Brij Bhushan Singh
WTC Final: अजिंक्य रहाणेच्या दुखापतीमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! जाणून घ्या अपडेट

कलम 164 अन्वये दंडाधिकाऱ्यासमोर नोंदवलेले बयाण न्यायालयात ग्राह्य आहे. आणखी एक ज्येष्ठ वकील आणि सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष विकास सिंग यांनी ब्रिजभूषण यांना अटक करण्यात आणि आरोपपत्र दाखल करण्यात सातत्याने होत असलेल्या विलंबावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे साक्षीदारांवर परिणाम होत असल्याची परिस्थिती निर्माण होत असल्याने आरोप दाखल करण्यास विलंब का होत आहे, याची चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, असे ते म्हणाले.

दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, हे प्रकरण संवेदनशील असल्याने आणि लैंगिक छळाच्या आरोपांचा समावेश असल्याने पोलिस आणि दंडाधिकार्‍यांसमोर पीडितेचे जबाब नोंदवून पुढील तपासासाठी विचार केला जाईल. पीडितेच्या वडिलांनी या प्रकरणातील आरोपीवर लैंगिक छळाचे खोटे आरोप केल्याचे माध्यमात मान्य केले असले तरी, त्याने असे वक्तव्य कोणत्या परिस्थितीत केले याचा तपास आणि पडताळणी करणेही गरजेचे आहे.

यू-टर्न असूनही पोलिस तपास सुरू ठेवू शकतात, असे ते म्हणाले. अल्पवयीन मुलाच्या वडिलांच्या वक्तव्यानंतर ब्रिज भूषण कोर्टात जाऊ शकतात का, असे विचारले असता ते म्हणाले की, खोट्या साक्षीच्या आरोपावरून त्यांच्यावर खटला चालवण्याची विनंती करू शकतो. द्विवेदी म्हणाले की तथाकथित 'यू-टर्न' हा तपासाचा एक पैलू असेल, परंतु तो खरा होता की दबावाखाली केला गेला होता. हे सर्व तपासाचे मुद्दे आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com