Wrestlers Protest : लैंगिक शोषण प्रकरणात कुस्तीपटू आंदोलनकर्त्यांना हवाय न्याय ; पी. टी. उषा

उषा यांचे कुस्तीपटूंना सहकार्याचे आश्‍वासन
PT Usha
PT Usha sakal

नवी दिल्ली : भारतीय कुस्तीपटूंनी रस्त्यावर उतरून आंदोलन केल्यामुळे बदनामी होत असल्याचे स्पष्ट मत भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्ष पी. टी. उषा यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केले होते. त्यानंतर चोहोबाजूंनी त्यांच्यावर टीका करण्यात आली. आता पी. टी. उषा यांनी बुधवारी भारतीय कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंची भेट घेतली आणि त्यांना या प्रकरणात सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले.

पी. टी. उषा यांनी प्रसारमाध्यमांशी संपर्क साधला नाही; पण भारताचा अनुभवी कुस्तीपटू बजरंग पुनिया याने उषा यांनी सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिल्याचे सांगितले. बजरंग याप्रसंगी म्हणाला, पी. टी. उषा यांनी आमच्या बेशिस्त वागणुकीमुळे बदनामी होते असे वक्तव्य केले होते. तेव्हा आम्हाला वाईट वाटले होते; पण येथे आल्यानंतर त्यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना म्हटले की, माझ्या वाक्याचा वेगळा अर्थ लावला गेला. त्या म्हणाल्या, मी आधी खेळाडू आहे. त्यानंतर प्रशासक आहे, असे बजरंग म्हणाला.

बजरंग म्हणाला, आम्ही उषा यांना म्हणालो, आमची सरकार किंवा इतर कुणाविरुद्धही लढाई नाही. कुस्तीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही येथे आंदोलन करीत आहोत. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला. आरोपी दोषी आढळला, तर त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई करायला हवी. आम्हाला न्याय मिळायला हवा, असे बजरंग याने नमूद केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com