Wrestling
Wrestling File Photo

Omicron : आफ्रिकेत होणारी कुस्ती स्पर्धा अनिश्चितकाळासाठी स्थगित

भारतीय कुस्तीपटू दोहा मार्गे जोहन्सबर्गला जाणार होते; पण...

दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमिक्रॉनच्या संसर्गामुळे जगातील मानाची आणि बहुप्रतिक्षित कुस्ती स्पर्धा रद्द झाली आहे. दक्षिण आफ्रिकेतील जोहन्सबर्गमध्ये राष्ट्रकुल कुस्ती चॅम्पियशिप नियोजित होती. 3 ते 5 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत भारतातील 60 कुस्तीपटू सहभागी होणार होते. परंतु ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांनी जोहन्सबर्ग विमान सेवा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कुस्ती चॅम्पियनशिप अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय़ आयोजकांनी घेतला.

सध्याच्या घडीला दक्षिण आफ्रिकेत निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे ही स्पर्धा जरी स्थगित झाली असली तरी पुढील वर्षी मार्चमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात येऊ शकते. या स्पर्धेसाठी भारतीय कुस्तीपटू बुधवारी 1 डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार होते. स्पर्धेत सहभागी होणारा भारतीय कुस्ती संघ दोहा मार्गे जोहन्सबर्गला पोहचणार होता. परंतु दोहा ते दक्षिण अफ्रिका विमानसेवा स्थगित झाल्यामुळे स्पर्धा संकटात आली.

 Wrestling
प्रितीच्या पंजाबची स्मार्ट खेळी; पर्समध्ये ठेवली मोठी रक्कम

इंग्लंड, स्कॉटलंड, पाकिस्तान, श्रीलंका, केनिया या देशांनीही सध्याच्या घडीला स्पर्धेसाठी येणे शक्य नसल्याचे आयोजकांना कळवले होते. ओमिक्रॉनच्या संकटाची चाहूल पाहता क्रीडा क्षेत्रावर पुन्हा एकदा संकटाचे ढग दाटून आले होते. यापूर्वी 2017 मध्ये राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धा पार पडली होती. या स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी एकूण 59 पदक कमावली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com