WFI New Chief Elected : मी कुस्ती सोडतेय.... संजय सिंह WFI चे अध्यक्ष होताच साक्षी मलिकनं उचललं मोठं पाऊल

Sakshi Malik
Sakshi Malikesakal

WFI New Chief Sanjay Singh Sakhi Malik Announce Retirement : भारतीय कुस्ती परिषदेचे अध्यक्ष म्हणून ब्रिजभूषण शरण सिंह यांचे जवळचे मानले जाणारे संजय सिंह यांची निवड झाली आहे. या निवडीनंतर ब्रिजभूषण यांच्या समर्थकांनी जोरादर जल्लोष केला. मात्र ब्रिजभूषणविरूद्ध लैंगिक छळाचा आरोप करणारी महिला कुस्तीपटू साक्षी मलिकला हे रुचलं नाही. तिने पत्रकार परिषद घेत आपण कुस्ती सोडत असल्याचं सांगितलं.

Sakshi Malik
WFI New Chief Elected: भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी ब्रिजभूषण सिंहच्या खास व्यक्तीची निवड

भारतीय कुस्ती परिषदेच्या निवडणुकीत संजय सिंह हे अध्यक्ष झाले. संजय सिंह हे ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या जवळचे मानले जात आहेत. या निवडीनंतर सर्व ब्रिजभूषण समर्थकांनी जल्लोष केला. त्यात संजय सिंह देखील होते.

यानंतर ब्रिजभूषण यांच्याविरूद्ध लैंगिक शोषणाचा आरोप करत जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या साक्षी मलिकने आपली प्रतिक्रिया दिली. साक्षी मलिक म्हणाली की, 'आम्ही 40 दिवस रस्त्यावर झोपलो आणि देशातील अनेक लोकांनी आम्हाला पाठिंबा देखील दिला. जर ब्रिजभूषण शरण सिंह यांचा व्यावसायिक भागीदार आणि अत्यंत जवळचा व्यक्तीच भारतीय कुस्ती परिषदेचा अध्यक्ष झाला आहे. मी कुस्ती खेळणं साडून देत आहे.'

Sakshi Malik
Mohammed Siraj : 'मिया भाई'ला झालं तरी काय? आयपीएल ऑक्शननंतर सिराजीचा 'हार्टब्रेक'; इंस्टाग्राम स्टोरीनं वेधलं लक्ष

साक्षी मलिक माध्यमांशी बोलताना भावूक झाली होती. तिचा कंठ दाटून आला होता अन् डोळ्यात अश्रू होते. तिने देशवासीयांचे आंदोलन करताना दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले. ती म्हणाली की, 'आम्ही जिंकू शकलो नाही. आम्ही आमची लढाई शेवटपर्यंत लढली. मात्र जर भारतीय कुस्ती परिषदेचा अध्यक्ष जर ब्रिजभूषण शरण सिंह सारखाच असेल, त्याचाच व्यावसायिक भागीदार असेल तर मी माझी कुस्ती सोडते. आभारी आहे!'

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com