मातीवरील कुस्तीचीही राष्ट्रीय स्पर्धा?

संजय घारपुरे
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

मुंबई - मुंबई क्रिकेट संघटनेने चांगले गोलंदाज शोधण्यासाठी टेनिस क्रिकेट खेळणाऱ्या गोलंदाजांतून शोध घेण्याचे ठरवले. आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारतीय कुस्तीची कामगिरी अधिक उंचावण्यासाठी मातीवरील कुस्ती स्पर्धा या मोसमात घेण्याचा गांभीर्याने विचार करीत आहे. 

देशभरात मातीवरील कुस्ती लोकप्रिय आहे. विविध जत्रांत, तसेच अनेक महोत्सवाच्या निमित्ताने दंगली होत असतात. त्यात कुस्तीगीर मोठ्या प्रमाणावर सहभागी होतात, पण या कुस्तीगीरांच्या गुणवत्तेस आंतरराष्ट्रीय स्तरावर न्याय मिळत नाही. या कुस्तीगीरांची राष्ट्रीय स्पर्धा घेऊन त्यांना मॅटवरील कुस्तीसाठी तयार करण्याची योजना तयार होत आहे. 

अनेक राज्यांत मातीवरील कुस्ती स्पर्धा होतात. त्यांच्या केसरी स्पर्धा होतात. त्यात मोठ्या प्रमाणावर बक्षिसेही असतात. मात्र, त्या अधिकृत नसतात. त्यातील यशस्वी स्पर्धक आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धेसाठी जाऊ शकत नाहीत. ऑलिंपिक, आशियाई क्रीडा स्पर्धेपासून तर ते दूरच राहतात. या कुस्तीगीरांतून गुणवान कुस्तीगीर आपल्याला मिळू शकतील, असे एका वरिष्ठ कुस्ती पदाधिकाऱ्याने सांगितले.

आम्ही केवळ वरिष्ठ स्तरावरच नव्हे, तर मातीतील कुस्तीच्या वयोगटाच्या स्पर्धाही घेण्याचा विचार करीत आहोत. कमी वयात हे चांगले कुस्तीगीर मॅटवर आणता आले, तर त्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी घडवता येईल. आता पुरस्कर्ते लाभले असल्यामुळे कुस्तीगीरांचा शोध घेण्याची मोहीम सुकर होईल, असेही ते म्हणाले. आम्ही या स्पर्धेच्या स्वरूपाचा, तसेच त्यातील गटवारी कशी असेल, याचा अभ्यास सुरू आहे. ही स्पर्धा याच मोसमात सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले.

Web Title: Wrestling national competition?