
'वृद्धीमान हट्टी पोरगा, त्याला ना हरकत प्रमाणपत्र द्यावेच लागेल'
कोलकाता : क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालने एका वक्तव्याद्वारे भारताचा विकेटकिपर वृद्धीमान साहाने (Wriddhiman Saha) बंगालकडून रणजी ट्रॉफीची (Ranji Trophy) बाद फेरी खेळण्यास नकार दिला आहे. याचबरोबर वृद्धीमान साहाने बंगालचा वॉट्स अॅप ग्रुप देखील सोडल्याची माहिती मिळत आहे. अशा पद्धतीने वृद्धीमान साहाचा 2007 पासूनचा बंगालबरोबरचा प्रवास संपुष्टात येत आहे. बंगाल रणजी ट्रॉफीची झारखंड विरूद्धची क्वार्टर फायनल येत्या 6 जूनला खेळणार आहे.
हेही वाचा: RCB साठी वाईट बातमी; 'या' दिग्गज खेळाडूनं केलं नियमांचं उल्लंघन
क्रिकेट असोसिएशन बंगालचे (Cricket Association Bengal) अध्यक्ष अविषेक दालमिया आपल्या वक्तव्यात म्हणाले, 'अत्यंत महत्वाच्या सामन्यात क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालला वृद्धीमान साहाने बंगालकडून खेळावे असे वाटते. बंगाल सध्या बाद फेरीतील सामने खेळणार आहे. यंदाजी रणजी ट्रॉफी जिंकण्याची बंगालला संधी आहे. ग्रुप स्टेजला बंगाल अव्वल स्थानावर पोहचली आहे. मी माझ्या भावना वृद्धीमान साहापर्यंत पोहचवल्या आहेत. मी त्याला त्याच्या निर्णयाचा पुन्हा विचार करावा अशी विनंती देखील केली आहे. मात्र वृद्धामानने आम्हाला कळवले आहे की तो रणजी ट्रॉफी बाद फेरी खेण्यास उत्सुक नाही.'
37 वर्षाच्या वृद्धीमान साहाने आतापर्यंत 122 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. त्याने बंगाल असोसिएशनकडे राज्य बदलण्यासाठी एनओसीची (NOC) मागणी केली आहे. यावर बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या एका पदाधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, 'आता आम्ही यावर काय करू शकतो? वृद्धीमान हा हट्टी पोरगा आहे. आम्हाला त्याला एनओसी द्यावीच लागेल. मात्र कोणीही राज्य संघटनेला धमकी देऊ नये. कारण राज्य संघटना ही एखाद्या व्यक्तीपेक्षा मोठी असते.'
हेही वाचा: आर अश्विन हा राजस्थान रॉयल्ससाठी डोकेदुखी, मांजरेकर असं का म्हणाले?
श्रीलंकेविरूद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी निवडलेल्या भारतीय संघातून वृद्धीमान साहाला वगळण्यात आल्यानंतर वृद्धीमान साहाने रणजी ट्रॉफी ग्रुप स्टेज न खेळण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी सीएबीचे सह सचिव देबेंद्र दास यांना साहावर जाहीररित्या टीका केली होती. त्यावेळी साहाने कुटुंबातील एक व्यक्ती आजारी असल्याने आपण हा निर्णय घेतल्याचे सांगितले होते.
दरम्यान, झारखंड विरूद्धच्या क्वार्टर फायनलसाठी 22 खेळाडूंच्या बंगाल संघाची घोषणा झाली आहे. यात वृद्धीमान साहाचा देखील समावेश आहे. त्यानंतर अविषेक यांच्याशी त्याचे फोनवरून बोलणे झाले. यावेळी त्याने सह सचिवांवर निशाणा साधला. तो म्हणाला की निवडसमितीने संघाची घोषणा करण्यापूर्वी माझ्याशी बोलणे गरजेचे होते. त्यांनी मोहम्मद शमीशी संघ निवडण्याआधी चर्चा केली होती. याबाबत एका अधिकाऱ्याने सांगितले की, 'असोसिएशनच्या अध्यक्षांनी त्याच्याविरूद्ध केलेल्या वक्तव्याशी असोसिएशनचा कोणताही संबंध नसल्याचे वारंवार सांगितले. तरीही वृद्धीमान साहा नकार देत राहिला. ज्यावेळी एखादा खेळाडू भारतीय संघात असतो त्यावेळी रणजीसाठी संघ निवडण्यापूर्वी त्याच्याशी चर्चा केली जाते. ज्यावेळी वृद्धीमान साहा भारतीय संघात होता त्यावेळी आम्ही त्याच्याशी चर्चा करत होतोच.'
वृद्धीमान साहाला इंग्लंड विरूद्धच्या कसोटी सामन्यासाठी संघात स्थान मिळालेले नाही. मात्र गुजरात टायटन्सकडून आयपीएलमध्ये त्याने 10 सामन्यात 312 धावा केल्या आहेत. दरम्यान, रणजी ट्रॉफीचा सामना खेळण्यासाठी मोहम्मद शमीला बीसीसीआयची परवानगी घेणे गरजेचे आहे.'
Web Title: Wriddhiman Saha Is Stubborn We Have To Give Him Noc Says Cricket Association Bengal Official
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..