साहा धमकी प्रकरणात शास्त्रींची उडी; BCCI ने घेतली ही भूमिका

Ravi Shastri Support Wriddhiman Saha
Ravi Shastri Support Wriddhiman SahaSakal

Ravi Shastri Support Wriddhiman Saha : श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी 18 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या आगामी कसोटी मालिकेसाठी 37 वर्षीय अनुभवी यष्टीरक्षक खेळाडू वृद्धिमान साहा (Wriddhiman Saha) याची संघात निवड करण्यात आलेली नाही. खरे तर साहाच्या वाढत्या वयाचा विचार करून निवडकर्त्यांनी ऋषभ पंत आणि केएस भरत यांना अधिकाधिक संधी देण्याचा प्लॅन दिसतोय.

टीम इंडियातून (Team India) वगळल्यानंतर या यष्टिरक्षकाने रागही व्यक्त केला होता. दरम्यान, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांने एका पत्रकाराकडून धमकी मिळाल्याचा गौफ्यस्फोटही केला होता. यासंदर्भातील काही संदेश त्याने अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शेअर केले आहेत. त्यांने पत्रकाराने धमकावल्याचा आरोप केला होता. साहाच्या या आरोपानंतर क्रिकेट जगतातील तमाम दिग्गज त्यांचे समर्थन करत आहेत. पत्रकाराने केलेल्या मेसेजचा तीव्र निषेध करण्यात येत आहे.

Ravi Shastri Support Wriddhiman Saha
साहाने चॅट उघड करताच गांगुलीचा मोठा भाऊ म्हणाला 'चूक' केलीस

भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांनीही ट्विट करून साहाचे समर्थन केले आहे. एका पत्रकाराकडून खेळाडूला धमकावले जात आहे, हे आश्चर्यकारक आहे, असे त्यांनी लिहिले आहे. हा आपल्या पदाचा दुरुपयोग आहे, असेही ते पुढे म्हणाले. भारतीय संघासोबत हे सातत्याने घडत आहे. एवढेच नाही तर माजी प्रशिक्षकाने बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी या प्रकरणाकडे गांभिर्याने पाहावे, असे म्हटले आहे. ती व्यक्ती कोण आहे हे शोधून काढावे अशी भावना शास्त्रींनी बोलून दाखवली आहे. हे प्रत्येक क्रिकेटपटूच्या हिताचे आहे, असा उल्लेखही त्यांनी केलाय.

Ravi Shastri Support Wriddhiman Saha
भडकलेल्या वृद्धीमानच्या वक्तव्यावर द्रविडचे 'कूल' उत्तर

काय आहे प्रकरण?

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून वगळण्यात आल्यानंतर वृद्धिमान साहाने पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेला काही निवडक पत्रकारांना बोलवल्याचा दावा करत एका पत्रकाराने साहाला धमकावले होते. साहाने यासंदर्भातील स्क्रीन शॉट सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले होते. मुलाखत देण्यासाठी पत्रकाराने त्याच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचे या स्क्रीन शॉट्सवरुन दिसून आले होते.

बीसीसीआय करणार कारवाई

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, याप्रकरणात बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने प्रतिक्रिया दिली आहे. साहा अद्याप बीसीसीआयशी करारबद्ध आहे. त्यामुळे बीसीसीआयने त्याचे आरोप गंभीरतेनं घेतले असून याप्रकरणाची सखोल तपास करण्याचा निर्णय घेतला आहे. अन्य खेळाडूंसोबतही असा प्रकार घडतोय का? याची देखील चौकशी होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com