esakal | WTC Final : काय आहे विराट कोहली-शास्त्री गुरुजींची डोकेदुखी?
sakal

बोलून बातमी शोधा

WTC Final INDvsNZ

WTC Final : काय आहे विराट कोहली-शास्त्री गुरुजींची डोकेदुखी?

sakal_logo
By
नामदेव कुंभार

World Test Championship Final : विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा आणि इंग्लंड अशा चार महिन्याच्या प्रदिर्घ दौऱ्यावर भारतीय संघ इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. विलगीकरणाचा कालावधी पुर्ण केल्यानंर टीम इंडियानं सरावालाही सुरुवात केली. 18 जून ते 22 जून 2021 यादरम्यान, न्यूझीलंड आणि भारत यांच्यामध्ये विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. आक्रमक आणि विस्फोटक विराट कोहलीसमोर शांत आणि संयमी केन विल्यमसनचं आव्हान आसणार आहे. या लढतीकडे संपुर्ण क्रीडा विश्वाचं लक्ष लागलं आहे. दोन्ही संघ आपल्या रननित्या तयार करण्यात व्यस्त असेल. या सर्व घडामोडींमध्ये कर्णधार विराट कोहली आणि कोच रवी शास्त्री यांच्यापुढे संघ निवडीचा पेच कायम आहे.

अश्विन आणि जडेजा या दोन फिरकी गोलंदाजासह मैदानात उतरायचं का? वेगवान गोलंदाज किती खेळवायचे? हनुमा विहारी याला अंतिम 11 मध्ये संधी द्यायची का? सिराज की इशांत कोणाला संघा संघात स्थान द्यायचं? रोहित शर्मासोबत सलामीला कोणाला संधी द्यायची? यासारखे प्रश्न विराट आणि रवी शास्त्री यांच्यापुढे आहेत. फायनलसाठी संघात कोणा कोणाला स्थान द्यायचं याबाबत पेच निर्माण झाला आहे.

हेही वाचा: कोरोनाचा हाहा:कार; दिवसभरात 6 हजार 148 जणांचा मृत्यू

मोहम्मद सिराजला संघात स्थान देण्यासाठी विराट कोहली आणि रवी शास्त्री प्लॅन तयार करत आहेत. कारण असं पहिल्यांदाच झालेय की जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी इशांत शर्मा आणि उमेश यादव भारताचे चारही प्रमुख गोलंदाज उपलब्ध आहेत. या चार गोलंदाजाशिवाय मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर हे दोन वेगवान आणि स्विंग गोलंदाजही उपलब्ध आहेत. त्यामुळे अंतिम 11 मध्ये कोणला संधी द्यायची? हा प्रश्न विराटपुढे आहे. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांचं संघातील स्थान कायम मानलं जात आहे. भारतीय संघ तीन वेगवान गोलंदाजासह उतरल्यास कोणाला संधी देणार? चार वेगवान गोलंदाजासह खेळण्याचा विराट कोहली विचार करत असेल तर शार्दुल ठाकूरचं स्थान पक्कं मानलं जातेय. कारण, शार्दुल ठाकूर तळाला फलंदाजी करु शकतो.

हेही वाचा: HIV+ महिलेच्या शरिरात 216 दिवस कोरोना; 32 वेळा झाला म्युटेट

रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांचं अंतिम 11 मधील स्थान पक्कं मानलं जातं आहे. रोहित शर्मासोबत सलामीला कोणाला संधी मिळणार? विराट कोहली युवा शुबमन गिल याच्यावर विश्वास दाखवणार का? की मंयाक आणि राहुलपैकी कोणाला संधी देणार. रोहित शर्माचं स्थान पक्कं आहे. उर्वरित दुसऱ्या सलामीविरासाठी तीन खेळाडूंमध्ये स्पर्धा आहे.

हेही वाचा: WTC Final : तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे

भारतीय संघ किती फिरकी गोलंदासह मैदानात उतरणार? याबाबतची उत्सुकताही आहे. काही माजी खेळाडूंच्या मते अश्विन आणि जडेजासह विराट कोहलीनं मैदानात उतरायालं हवं. मात्र, खेळपट्टी पाहून विराट कोहली एकाच फिरकीपटूला संधी देऊ शकतो. अश्विन, जडेजा, अक्षर पटेल आणि वाशिंग्टन सुंदर असे चार फिरकीपटू आहे. चारही खेळाडू गोलंदाजीसोबत उत्तम फलंदाजीही करण्यास तरबेज आहेत. त्यामुळे कोणाला संधी द्यायची? ही विराट कोहलीसमोरील डोकेदुखीच आहे. पण अश्विन आणि जडेजाचं पारडं जड मानलं जातं आहे. एकाच फिरकीपटूसह उतरायचं म्हटल्यास अश्विन की जडेजा? कोणाला संधी देणार? हा प्रश्न कायम राहतो.

हेही वाचा: WTC मध्ये 'हे' तीन भारतीय खेळाडू ठरणार 'गेमचेंजर'

भारतीय संघ -( India's squad ): विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उप कर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वाशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इंशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव.