Ind vs Aus Playing-11: दिग्गज खेळाडूकडून WTC फायनलसाठी टीम इंडियाच्या प्लेइंग 11ची घोषणा

भारताचे महान फलंदाजकडून टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनची निवड
WTC Final 2023 Ind vs Aus Playing 11
WTC Final 2023 Ind vs Aus Playing 11sakal

WTC Final 2023 Ind vs Aus Playing 11 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 7 जून ते 11 जून दरम्यान इंग्लंडमधील केनिंग्टन ओव्हल मैदानावर खेळल्या जाणार आहे. दिग्गज खेळाडूकडून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलच्या दोन दिवस आधी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. भारताचे महान फलंदाज सुनील गावसकर यांनी 7 जूनपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू होणाऱ्या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनची निवड केली आहे.

WTC Final 2023 Ind vs Aus Playing 11
Topless Sports league: 'या' अनोख्या स्पोर्ट्स लीगची चर्चा! नक्की काय आहे स्पर्धा, जाणून घ्या

भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एकापेक्षा जास्त दिग्गज खेळाडूंची निवड करून आपला सर्वोत्तम संघ बनवला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी सुनील गावसकरच्या सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनमध्ये धाकड खेळाडूंचा समावेश आहे.

सुनील गावसकर यांनी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी शुभमन गिलला त्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सलामीवीर म्हणून स्थान दिले आहे. सुनील गावसकर यांनी शुभमन गिलचा सलामीचा जोडीदार म्हणून रोहित शर्माची निवड केली आहे. चेतेश्वर पुजाराला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आणि विराट कोहलीला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी निवडले आहे.

WTC Final 2023 Ind vs Aus Playing 11
WTC Final Ind vs Aus : भारतीय फलंदाजांसमोर मोठे आव्हान, सामन्याचा डोलारा हेलकावे खाणार

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी त्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अजिंक्य रहाणेला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी निवडले आहे. सुनील गावसकर यांनी त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सहाव्या क्रमांकाची आणि केएस भरतची यष्टिरक्षकाच्या भूमिकेसाठी निवड केली आहे. इशान किशनपेक्षा केएस भरतला यष्टिरक्षक फलंदाज म्हणून पसंती दिली आहे. रवींद्र जडेजाची 7 व्या क्रमांकाची आणि अष्टपैलूच्या भूमिकेसाठी निवड केली आहे.

सुनील गावसकर यांनी आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर या वेगवान गोलंदाजांची निवड केली आहे. प्लेइंग इलेव्हनमध्ये फिरकी गोलंदाज म्हणून रविचंद्रन अश्विनची निवड केली आहे.

डब्ल्यूटीसी फायनलसाठी सुनील गावसकरचे Playing 11 :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com