WTC Final 2023: अजिंक्य रहाणे अन् शार्दुल ठाकूरचे पुनरागमन, 3 खेळाडू संघाबाहेर

टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कोणती असेल याबाबत सस्पेन्स...
WTC Final 2023
WTC Final 2023

WTC Final 2023 IND vs AUS : आयपीएलनंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप म्हणजेच WTC 2023 चा फायनल बुधवारपासून खेळल्या जाणार आहे. यामध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया आणि पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया यांच्यात शानदार सामना रंगणार आहे.

दरम्यान, टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कोणती असेल याबाबत सामन्याच्या एक दिवस आधीपर्यंत संपूर्ण सस्पेन्स ठेवण्यात आला आहे. म्हणजेच भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता कर्णधार रोहित शर्मा टॉससाठी मैदानात दाखल होईल, तेव्हाच भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन कोणती असेल हे कळेल.

टीम इंडियासाठी चांगली गोष्ट म्हणजे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलपूर्वी टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासोबत चार टेस्ट मॅचची सीरिज खेळली. फरक एवढाच की, शेवटची मालिका भारतात खेळली गेली होती आणि यावेळी अंतिम सामना इंग्लंडमध्ये खेळला जाणार आहे. मात्र गेल्या मालिकेपासून भारतीय संघात फारसा बदल झालेला नाही.

WTC Final 2023
Wrestlers Protest: "त्या अफवेवर विश्वास ठेवू नका', बजरंग पुनियाचा हात जोडलेला व्हिडिओ व्हायरल

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत अजिंक्य रहाणे नव्हता. पण आयपीएल 2023 मध्ये अजिंक्य रहाणेने अशा काही दमदार खेळीमुळे त्यांची भारतीय टेस्ट टीममध्ये एंट्री झाली.

सूर्यकुमार यादव हा चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतही टीम इंडियाचा भाग होता, पण यावेळी त्याला WTC फायनलसाठी टीम इंडियामध्ये स्थान मिळालेले नाही ही आणखी एक बाब आहे. पण स्टँडबाय खेळाडूंच्या यादीत त्याचा समावेश आहे. अजिंक्य रहाणेचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाईल, पण सूर्यकुमार यादव खेळू शकणार नाही.

इतकंच नाही तर शार्दुल ठाकूरही त्या मालिकेत टीम इंडियात नव्हता. तो खराब कामगिरीमुळे किंवा दुखापतीमुळे नाही तर त्याच्या लग्नामुळे टीम इंडियातून बाहेर होता, पण आता त्याची पुन्हा फायनलसाठी निवड झाली आहे.

WTC Final 2023
IND vs AUS: टीम इंडियासाठी वाईट बातमी! WTC Finalच्या आधी आलेल्या 'त्या' फोटोनंतर वाढल टेन्शन

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी टीम इंडियामध्ये इशान किशनचाही समावेश करण्यात आला होता, परंतु त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. यानंतर जेव्हा डब्ल्यूटीसी फायनलसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली तेव्हा तो त्या संघात नव्हता, पण संघ जाहीर झाल्यानंतर कळले की केएल राहुल दुखापतग्रस्त आहे आणि तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप खेळू शकणार नाही.

इशान किशनचा संघात बदली खेळाडू म्हणून प्रवेश झाला. तो प्लेइंग इलेव्हनमध्ये असेल की केएस भरत अंतिम फेरीत खेळताना दिसेल हे सांगणे कठीण असले तरी, चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील सर्व सामने केएस भरतने खेळले होते, त्यामुळे त्याच्या खेळण्याची शक्यता अधिक आहे.

WTC Final 2023
Wrestlers Protest : कुस्तीपटू आंदोलन प्रकरणी कारवाईला वेग! ब्रिजभूषण सिंग यांच्या घरी धडकले दिल्ली पोलिस

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेनंतर आणखी एक मोठा बदल म्हणजे याआधी संघात असलेल्या कुलदीप यादवलाही वगळण्यात आले आहे. याचे कारण म्हणजे संघात रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल आधीच आहेत.

तसेच, एकच सामना खेळायचा आहे आणि तिन्ही फिरकीपटू संघाचा भाग असण्याची शक्यता कमी आहे, त्यामुळे कुलदीप यादवला घेण्यात काही अर्थ नव्हता. त्यामुळेच कुलदीप यादवला तूर्तास संघाबाहेर ठेवण्यात आल्याचे मानले जात आहे.

WTC फायनलसाठी पूर्ण भारतीय संघ : रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रविचंद्रन अश्विन, केएस भरत, रवींद्र जडेजा, इशान किशन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, उमेश यादव.

स्टँडबाय खेळाडू : यशस्वी जैस्वाल, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com