Rohit Sharma Playing 11 : प्लेईंग 11 नाही तर प्लेईंग 15... रोहितनं संघाला असं काय सांगितलं?

Rohit Sharma WTC Final Playing 11
Rohit Sharma WTC Final Playing 11esakal

Rohit Sharma WTC Final Playing 11 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील WTC Final उद्यापासून (7 जून) ओव्हलवर सुरू होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा पत्रकार परिषदेला सामोरा गेला. त्याने पत्रकारांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. पत्रकारांनी रोहितला यावेळी प्लेईंग 11 बाबत खोदून खोदून विचारण्याचा प्रयत्न केला.

मात्र रोहित शर्माने प्लेईंग 11 बाबत आपले पत्ते काही केल्या उघड केले नाही. एका पत्रकाराने तर थेट अश्विनला संघाबाहेर बसवणार असा गुगली टाकला. मात्र रोहितने हा गुगली परतवून लावला. रोहितने मी सर्व 15 खेळाडूंना उद्याच्या सामन्यासाठी तयार राहण्याची सुचना केल्याचे सांगितले. रोहित म्हणाला की, संघाला असं सांगण्यामागं एक खास कारण आहे.

Rohit Sharma WTC Final Playing 11
WTC Final 2023 IND vs AUS : प्रथम फलंदाजी करायची की गोलंदाजी... 'पाच' पथ्य पाळणार तोच WTC चॅम्पियन बनणार

रोहित शर्माने प्लेईंग 11 बाबत कोणतीही माहिती देण्यास नकार दिल्यानंतर एका पत्रकाराने आर अश्विन सारख्या खेळाडूला संघाबाहेर ठेवणे किती कठिण असते असा प्रश्न विचारत गुगली टाकला. यावर रोहित शर्माने देखील खुबीने उत्तर देत आपली प्लेईंग 11 गुलदस्त्यातच ठेवली.

रोहित शर्मा म्हणाला की, 'मी अश्विनला खेळवणार नाही असं म्हणालो नाही. तुम्हाला उद्यापर्यंत वाट पहावी लागले. कारण मी ही खेळपट्टी पाहिली आहे. ही खेळपट्टी दिवसागणिक बदलत जाते. आज ही जशी दिसते तशी उद्या दिसेलच असे नाही. त्यामुळे मी संघातील खेळाडूंना स्पष्ट संदेश दिला आहे. संघातील सर्व 15 खेळाडूंनी उद्या खेळायचं आहे याच तयारीत रहा. आम्ही उद्या परिस्थितीतचा आढावा घेऊ आणि मगच आमची प्लेईंग 11 निश्चित करू.

Rohit Sharma WTC Final Playing 11
Rohit Sharma: 'प्रत्येक वेळी आठवण करून देण्याची गरज...' पत्रकारांच्या 'त्या' प्रश्नावर रोहित शर्मा भडकला

रोहितला ओव्हलवर यापूर्वी जून महिन्यात कसोटी सामना झाला नसल्याबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी रोहितने उत्तर दिले की, 'मी ही गोष्ट ऐकून आहे की इथं जूनमध्ये जास्त क्रिकेट खेळलं जात नाही. मात्र काऊंटी क्रिकेटचा हंगाम अताच खेळला जात आहे. आम्ही काही आठवड्यापूर्वी येथे काऊंटीचा सामना खेळल्याचं पाहिलं आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामातील हा पहिलाच सामना आहे असं नाही.'

रोहित पुढे म्हणाला की, आम्ही इथली परिस्थिती जाणून आहोत. पुढच्या पाच दिवसात काय होणार आहे हे आम्हाला माहिती आहे. हवामानाची स्थिती ठिक आहे. जर संघाच्या कॉम्बिनेशन बाबत बोलायचं झालं तर मला वाटतं की तुम्ही उद्यापर्यंत वाट पहावी.

(Sports Latest News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com