
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या पहिल्या दिवशी कागिसो रबाडा आणि मार्को जॅन्सन यांनी घातक गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला २१२ धावांत गुंडाळले. रबाडाने ५१ धावांत पाच आणि जॅन्सनने ४९ धावांत तीन बळी घेत ऑस्ट्रेलियाला अडचणीत आणले. यानंतर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनीही हल्ला चढवला. मिचेल स्टार्कने पहिल्याच षटकात दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का दिला. खेळ थांबला तेव्हा संघाने २२ षटकांत ४३ धावांत ४ बळी गमावले होते. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाकडे अजूनही १६९ धावांची आघाडी आहे.