esakal | 18 जून आणि भारताचा पराभव, विराट कोहली चक्रव्यूह भेदणार का?
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli

18 जून आणि भारताचा पराभव, विराट कोहली चक्रव्यूह भेदणार का?

sakal_logo
By
नामदेव कुंभार

IND vs NZ, WTC Final 2021 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यादरम्यान 18 जून रोजी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना (ICC WTC Final 2021) होणार आहे. इंग्लंडमध्ये होणाऱ्या या लढतीकडे संपूर्ण क्रीडा प्रेमींचं लक्ष लागलं आहे. दोन्ही संघामध्ये एकापेक्षा एक दर्जेदार खेळाडूंचा भरणा आहे. 18 जून ते 22 जून दरम्यान कसोटीचा बॉस कोण? हे ठरणार आहे. भारतीय चाहत्यांना विराट अॅण्ड कंपनी खिताब भारतात आणेल, असा विश्वास आहे. पण 18 जून ही तारीख भारतासाठी खूप अनलकी आहे. 18 जून रोजी भारतीय संघाला याआधी अनेकदा पराभवाचं तोंड पाहावं लागल्याचा इतिहास आहे. विराट कोहली 18 जूनचं चक्रव्यूह भेदणार का? हा प्रश्न क्रीडा प्रेमींसमोर आहे.

पाकिस्तानकडून पराभव -

चार वर्षापूर्वी 18 जून 2017 मध्ये चॅम्पियन टॉफ्रीमध्ये पाकिस्तानवे भारतीय संघाचा पराभव केला होता. भारतीय संघाला विजयाचा प्रबळ दावेदार मानलं जात होतं. मात्र, पाकिस्तानने भारतीय संघाचा दारुण पराभव केला होता. भारतीय संघाला पाकिस्तानने 180 धावांनी हरवलं होतं.

हेही वाचा: WTC Final : 'रोहित-विराट नव्हे पंतची भिती वाटतेय'

झिम्बॉम्बेनेही केला होता पराभव -

18 जून 2016 रोजी भारत आणि झिम्बॉम्बे यांच्यादरम्यान पहिला टी-20 सामना पार पडला होता. या सामन्यात झिम्बॉम्बेने भारताचा दोन धावांनी पराभव केला होता. अखेरच्या चेंडूवर धोनी असतानाही भारतीय संघाचा पराभव झाला होता.

बांग्लादेशनेही हरवलं -

18 जून 2015 रोजी भारतीय संघाला बांगलादेशकडून पराभवाच सामना करावा लागला होता. एकदिवसीय सामन्यात बांगलेदाशने भारताला 79 धावांनी पराभव केला होता.