ICC WTC 2025 : ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये कोणी जिंकले तरी टीम इंडियाला पडत नाय फरक.... जाणून घ्या WTC समीकरण

इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीतील विजयासह भारताने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखले आहे.
WTC Points Table 2023-25 Update Marathi News
WTC Points Table 2023-25 Update Marathi Newssakal

ICC WTC 2025 Points Table Update : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीतील विजयासह भारताने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखले आहे. धरमशाला येथे झालेल्या सामन्यात भारताने इंग्लंडचा एक डाव आणि 64 धावांनी पराभव केला.

टीम इंडियाचा इंग्लंडवर डावाच्या फरकाने हा दुसरा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी 2016 मध्ये चेन्नईमध्ये भारताने इंग्लिश संघाचा एक डाव आणि 75 धावांनी पराभव केला होता.

या विजयामुळे जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2023-25 गुणतालिकेत भारताचे स्थान आणखी मजबूत झाले आहे. पण चाहत्यांच्या मनात प्रश्न आहे की, क्राइस्टचर्चमध्ये सुरू असलेल्या न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याचा WTC पॉइंट टेबलवर काय परिणाम होईल का? न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियापैकी कोणीही हा सामना जिंकला तर टीम इंडिया खाली येईल का?

WTC Points Table 2023-25 Update Marathi News
Team India : कसोटी मालिका संपली! आता टीम इंडिया थेट इतक्या महिन्यांनंतर 'या' संघाविरुद्ध दिसणार ॲक्शनमध्ये

आपण सगळ्यात आधी सध्याच्या WTC पॉइंट्स टेबलवर एक नजर टाकूया. भारतानंतर न्यूझीलंड 60 टक्के गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. आणि ऑस्ट्रेलिया 59.09 टक्के गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

ख्राईस्टचर्च कसोटी जिंकण्यासाठी न्यूझीलंडने कांगारूंना 279 धावांचे लक्ष्य दिले आहे. पण भारताने WTC पॉइंट टेबलमध्ये आपले नंबर-1 स्थान इतके मजबूत केले आहे की, या सामन्याचा त्यांच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. याचा अर्थ असा की, क्राइस्टचर्चमध्ये न्यूझीलंड किंवा ऑस्ट्रेलिया जिंकली तरी भारतावर कोणाताही परिणाम होणार नाही.

WTC Points Table 2023-25 Update Marathi News
ICC Rankings : रोहित ब्रिगेडचा बोलबाला! क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये पुन्हा एकदा टीम इंडिया नंबर वन

जर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटीतही न्यूझीलंडचा पराभव केला तर तर तो 62.5 टक्के गुणांसह WTC गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर जाईल, तर न्यूझीलंड तिसऱ्या स्थानवर जाईल. दुसरीकडे, जर न्यूझीलंड क्राइस्टचर्चमध्ये कांगारूंना पराभूत करण्यात यशस्वी ठरला, तर ते 66.66 टक्के गुणांसह दुसऱ्या स्थानावर राहील, तर ऑस्ट्रेलियाच्या खात्यात 54.16 टक्के गुण होतील. या स्थितीत, पॉइंट टेबलमधील स्थानाच्या बाबतीत कोणताही बदल होणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com