esakal | राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारच्या कन्येचा 'सुवर्ण' पंच I Boxing Competition
sakal

बोलून बातमी शोधा

Yashashree Dhanawade

रायगडातील प्रतिस्पर्धी खेळाडूवर मात करून यशश्रीनं सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलंय.

राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारच्या कन्येचा 'सुवर्ण' पंच

sakal_logo
By
संदीप गाडवे

केळघर (सातारा) : चंद्रपुरात सुरू असलेल्या 20 व्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत (State level boxing competition) जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय, मेढा (MLA Shashikant Shinde College, Medha) येथील बी.ए. भाग दोनची विद्यार्थींनी यशश्री धनावडे (Yashashree Dhanawade) हिने सातारा जिल्हा संघाचे प्रतिनिधीत्व करत सुवर्णपदक पटकावलेय.

यशश्रीने चार वेळा राष्ट्रीय स्पर्धा खेळल्या असून रायगडातील प्रतिस्पर्धी खेळाडूवर मात करून या स्पर्धेचा अंतिम सामना जिंकून सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलंय. या सुवर्णपदकाबरोबरच यशश्रीची 21 ते 27 ऑक्टोबर अखेर हरियाणात होणाऱ्या वरिष्ठ महिला राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी (Women National Boxing Competition) महाराष्ट्र संघात निवड झालीय.

हेही वाचा: NDA, NA मध्ये फक्त 400 जागा; महिला उमेदवारांची संख्या वाढणार?

यशश्रीच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, सचिव वैशालीताई शिंदे, विश्वस्त अशोकराव नवले, राहुल जगताप, दादासाहेब शिंदे, प्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे व प्राध्यापकांनी अभिनंदन केले आहे. यशश्रीला महाविद्यालयाचे जिमखाना विभाग प्रमुख प्रा. प्रमोद चव्हाण व प्रशिक्षक सागर जगताप यांचे मार्गदर्शन लाभले. दरम्यान, यशश्रीचा प्राचार्य डॉ. घाटगे यांच्या हस्ते मेढ्यात सत्कार करण्यात आला.

loading image
go to top