Ranji Trophy : 54 चेंडूनंतर खाते उघडणाऱ्या यशस्वीची विक्रमी दीडशतकी खेळी

Yashasvi Jaiswal record Century In Ranji Trophy Semi Final Mumbai vs Uttar Pradesh
Yashasvi Jaiswal record Century In Ranji Trophy Semi Final Mumbai vs Uttar Pradeshesakal

बंगळुरू : रणजी ट्रॉफी मुंबई विरूद्ध उत्तर प्रदेश सेमी फायनल सामन्यात मुंबईने चौथ्या दिवशी चांगली पकड मिळवली आहे. मुंबईचा सलामीवीर यशस्वी जैसवालने संथ सुरूवातीनंतर दमदार दीडशतकी खेळी केली. त्याने पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावात देखील शतक ठोकले. पहिल्या डावात त्याने 100 तर दुसऱ्या डावात 181 धावांची खेळी केली. याचबरोबर यशस्वी जौसवाल रणजी ट्रॉफीच्या सामन्यात दोन्ही डावात शतकी खेळी करणारा मुंबईचा आठवा फलंदाज ठरला. (Yashasvi Jaiswal record Century In Ranji Trophy Semi Final Mumbai vs Uttar Pradesh)

Yashasvi Jaiswal record Century In Ranji Trophy Semi Final Mumbai vs Uttar Pradesh
IND vs RSA : 'भारतीय टी 20 संघासाठी ऋषभ पंत नाही खात्रीलायक'

यापूर्वी रोहित शर्मा (2009), अजिंक्य रहाणे (2009), वसिम जाफर (2010), एसएम कादरी, दत्तू फडकर, विनोद कांबळी, सचिन तेंडुलकर यांनी हा कारनामा केला होता. आता या यादीत यशस्वी जैसवालचे देखील नाव जोडले गेले आहे. यशस्वी जैसवाल आता एका खास रेकॉर्डच्या उंबरठ्यावर उभा आहे. यशस्वी जैसवालने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सलग तिसऱ्या डावात शतक ठोकले आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटच्या इतिहासाचा विचार केला तर सर डॉन ब्रॅडमनयांच्यासह तीन फलंदाजांनी सलग सहा डावात शतक ठोकले आहे. सीबी फ्राई आणि एमजे प्रोक्टर हे इतर दोन फलंदाज आहेत.

Yashasvi Jaiswal record Century In Ranji Trophy Semi Final Mumbai vs Uttar Pradesh
PHOTO : असा झाला भारतीय फुटबॉल संघाचा आशियाई कप 2023 पर्यंतचा प्रवास

याचबरोबर ब्रायन लारासह पाच खेळाडू असे आहेत ज्यांनी सलग पाच प्रथम श्रेणी डावात सलग पाच शतके ठोकली आहे. लाराबरोबरच इडी विक्स, माईक हसी, पार्थिव पटेल (2007-08) आणि कुमार संगकारा यांनी हा कारनामा केला आहे. आता मुंबई रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये प्रवेश करणार हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे यशस्वी जैसवालकडे फायनलमध्ये दोन्ही डावात शतक ठोकून ब्रायन लारा, कुमार संगकारा आणि पार्थिव पेटल्या पंक्तीत जावून बसण्याची संधी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com