Yashasvi Jaiswal : जौसवाल शतकांमागे शतके ठोकतोय ते याच दोन 'टॅटू'मुळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yashasvi Jaiswal Tattoo

Yashasvi Jaiswal : जौसवाल शतकांमागे शतके ठोकतोय ते याच दोन 'टॅटू'मुळे

Yashasvi Jaiswal Tattoo : रणजी ट्रॉफी 2022 - 23 च्या दुसऱ्या सामन्यात मुंबईचा सलामीवीर यशस्वी जैसवालने 162 धावांची दमदार खेळी केली. यानंतर यशस्वी जैसवालने इंडियन एक्सप्रेसला एक मुलाखत दिली. यावेळी यशस्वी जैसवालने आपल्या दोन्ही हातावरील टॅटूचा अर्थ सांगितला. हे टॅटू कोणा एका व्यक्तीचे नाहीत तर एक शब्द आणि एक तारीख आहे.

हेही वाचा: PCB Chairman Najam Sethi : देशद्रोहाचे आरोप झालेले PCB चे नवे चेअरमन नजम सेठी आहेत तरी कोण?

यशस्वी जैसवालने आपल्या एका हातावर ‘believe’ 16-10-2019 आणि दुसऱ्या हातावर ‘trust’ 7-5-2022 असे दोन टॅटू काढले आहेत. या दोन टॅटूमधील तारखांना यशस्वीच्या आयुष्यात खूप महत्व आहे. या यशस्वी जैसवालने 16 ऑक्टोबर 2019 मध्ये झारखंडविरूद्धच्या लिट्स A च्या सामन्यात 203 धावांची खेळी केली होती. या खेळीमुळे त्याला विश्वास निर्माण झाला की तोही चांगल्या खेळी करू शकतो.

यानंतर त्याने 7 मे रोजी 2022 आयपीएलमध्ये राजस्थान रॉयलकडून खेळत पंजाब किंग्जविरूद्ध 68 धावांची खेळी केली. त्याला आयपीएलमधलं पहिलं मॅन ऑफ द मॅच मिळालं होतं. यशस्वीने टॅटू फक्त हातावर नाही तर पोटाच्या वरच्या भागावर देखील गोंदवून घेतले आहेत. यात त्याने आयपीएल, रणजी ट्रॉफी, विजय हजारे, सईद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये कधी पदार्पण केले याचा उल्लेख केला आहे.

या टॅटूबद्दल आणि तारखांबद्दल यशस्वी म्हणला की, 'मी या तारखा माझ्या हातावर कायमच्या गोंदवून ठेवण्याचा निर्णय घेतला. माझ्यासाठी हे दोन टॅटू खूप महत्वाचे आहेत. या कायम मला मी कोण आहे आणि मी कायम माझ्या क्षमतांवर का विश्वास ठेवतो याची आठवण करून देत असतात. हे दोन शब्द सध्या माझ्या आयुष्यात खूप महत्वाचे आहेत.'

हेही वाचा: BCCI Apex Council Meeting : बैठक संपली! द्विशतक ठोकूनही रहाणेला डच्चू; स्कायला मात्र बढती?

जौसवाल पुढे म्हणाला की, 'मी दुसऱ्या कोणत्याही खेळाडूसारखेच चांगली कामगिरी करू इच्छितो. मात्र कुठेतरी माझ्यामध्ये आत्मविश्वाचाची कमतरता होती. ज्यावेळी मी अपयशी ठरत होतो त्यावेळी मी स्वतःला विचारायचो की मी चांगला खेळाडू आहे की खराब? एकेदिवशी मी स्वतःला सांगितले की मला चांगली कामगिरी करून यशस्वी होण्याची गरज आहे. मला स्वतःवर विश्वास ठेवावा लागले. हे फक्त दोन शब्द आहेत. मात्र मला माझ्या आयुष्यात हे शब्द महत्वाचे आहेत.'

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...