Pro Kabaddi 2019 : पुणे संघाची युपीकडूनही हार 

UP Yoddha beat
UP Yoddha beat

दिल्ली - प्रो-कबड्डीच्या सातव्या मोसमात  पुणेरी पलटण संघाची अपयशी मालिका दिल्ली टप्प्यातही कायम राहिली. त्यांनी सोमवारी झालेल्या सामन्यात युपी योद्धा संघाकडून 35-30 असा पराभव पत्करावा लागला. श्रीकांत जाधवचे चढाईतील 15 गुण त्यांच्या विजयात निर्णायक ठरले. उत्तरार्धात त्याच्या खोलवर चढायांना त्यांच्या बचावफळीची सुरेख साथ मिळाली. त्यांच्याकडून सुमितने पकडीचे पाच गुण मिळवून श्रीकांतला सुरेख साथ केली. पुण्याकडून मनजीतने चढाईचे 16 गुण मिळविले. पण, त्यांचा बचाव कुचकामी ठरला. त्यांच्या सुरजीत, हादी आणि गिरीश इरनाक या अनुभवी बचावपटूंना गुणांचे खातेही उघडता आले नाही. 

त्यापूर्वी झालेल्या सामन्यात मनिंदर सिंग आणि के. प्रपंजन यांच्या यशस्वी चढायांनंतरही बंगाल वॉरियर्सला हरियाना स्टिलर्सकडून 33-36 असा पराभव पत्करावा लागला. हरियानाच्या विजयात पुन्हा एकदा विकास कंडोलाच्या चढाया निर्णायक ठरल्या. विकासच्या एकाहाती खेळाने हरियानाला आणखी एका विजयाला गवसणी घालता आली. त्याने 11 गुणांची नोंद केली. विनयने 9 गुण मिळवून त्याला सुरेख साथ केली. बंगालकडून मनिंदरने 15, तर प्रपंजनने 7 गुणांची कमाई केली. मात्र, त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com