Yoga : योगासनात महाराष्ट्र संघाला दोन पदके

राष्ट्रीय स्पर्धा : पदार्पणात वैभवचे सुवर्णपदक
Yoga championship
Yoga championshipesakal

अहमदाबाद : योगपटू वैभव श्रीरामे आणि छकुली सेलोकर यांनी राष्ट्रीय स्पर्धेतील योगासनाचा पहिलाच दिवस गाजवला. नागपूरच्या या दोन योगापटूंनी शुक्रवारी राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाला दोन पदकांचा बहुमान मिळवून दिला. आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता वैभवने पारंपरिक योगासन प्रकारात सुवर्णपदक जिंकले; तसेच महिलांच्या पारंपरिक योगासनात नागपूरच्या छकुलीने रौप्यपदकाची कामगिरी केली.

Yoga championship
Yoga Tips : पोटाची चरबी घटवण्यास फायदेशीर आहे चक्की चलनासन

वैभव श्रीरामेने वेधले लक्ष

पारंपारिक आसन प्रकारात विभक्त विपरीत शलभासन, परिवर्त शिव लिंगरासन, एकपाद त्रिमुकूटत्तानासन, कैलासआसन, उर्दमुख टीटीभासन ही लक्षवेधी आसने केली. त्यामुळे त्याला ६१.८४ गुणांची सर्वोत्तम कामगिरी करता आली.

Yoga championship
Yoga Tips: विवाहित पुरुषांनी करावी 'ही' योगासने; जाणून घ्या फायदे

महिलांच्या पारंपरिक योगासनात सुवर्णपदकाची प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या छकुलीने सर्वोत्तम आसने करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिने महिलांच्या गटात ६२.३४ गुणांची कामगिरी करत रौप्यपदकाचा बहुमान पटकावला. यादरम्यान तिने सुवर्णपदकासाठी शर्तीची झुंज दिली. उपांत्य फेरीत सर्वोत्तम आसने करून तिने अंतिम फेरीत प्रवेश केला. छकुलीने विभक्त विपरीत शलभासन, परिवर्त शिव लिंगरासन, वामदेव त्रिपुरासन, कैलासआसन, उर्दमुख टीटीभासन ही पारंपरिक योगासने सादर केली.

Yoga championship
Yoga Tips: पाठदुखीच्या समस्येने त्रस्त असाल तर करा 'ही' योगासने

मेहनतीचे अफाट ‘वैभव’

नागपूर येथील वैभव श्रीरामे याची घरची परिस्थिती अतिशय बेताची आहे; मात्र अशाही परिस्थितीत त्यांनी घराची जबाबदारी सांभाळत. योगासनातील आपला छंद अविरतपणे जोपासला. त्याचे वडील नागपूर शहरांमध्ये इलेक्ट्रिशनचे काम करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com