"योगी'ने नाकारला हुंडा; फक्त एक रुपया शगून! 

पीटीआय
सोमवार, 16 जानेवारी 2017

नवी दिल्ली - ऑलिंपियन ब्रॉंझपदकविजेता मल्ल योगेश्‍वर दत्त सोमवारी हरियानातील कॉंग्रेस नेते जयभगवान शर्मा यांची मुलगी शीतल हिच्याशी विवाहबद्ध होत आहे. त्याने हुंडा नाकारला असून केवळ एक रुपयाचे नाणे शगून म्हणून स्वीकारले. योगीने सांगितले, ""आमच्या कुटुंबाला मुलींसाठी हुंडा जमविताना बरेच झगडावे लागले. त्यामुळे मी मोठा होताना दोन गोष्टी ठरविल्या. एक म्हणजे कुस्तीत चमकायचे आणि दुसरे म्हणजे हुंडा नाही घ्यायचा. माझे पहिले स्वप्न साकार झाले. आता दुसरे वचन पूर्ण करण्याची वेळ आली आहे.' योगीने या आशयाचे "ट्विट' केले. त्यानंतर अनेकांनी एक रुपया तरी का स्वीकारला, अशी त्याला विचारणा केली. 

Web Title: yogeshwar denied dowry