esakal | US Open विजेती एम्माचं पुणे कनेक्शन; पाहा व्हिडिओ
sakal

बोलून बातमी शोधा

US Open विजेती एम्माचं पुणे कनेक्शन; पाहा व्हिडिओ

US Open विजेती एम्माचं पुणे कनेक्शन; पाहा व्हिडिओ

sakal_logo
By
सुशांत जाधव

अमेरिकन ओपन स्पर्धेतून टेनिस जगताला नवी ग्रँडस्लॅम सम्राज्ञी मिळाली. ग्रेट ब्रिटनच्या 18 वर्षीय एम्मा राडूकानूने ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. पात्रता फेरीतून मुख्य फेरी गाठत थेट फायनल जिंकण्याचा पराक्रम तिने करुन दाखवला. रशियन टेनिस सुंदरी मारिया शारापोव्हानंतर सर्वात कमी वयात ग्रँडस्लॅम जिंकण्याचा विक्रम एम्माच्या नावे झाला आहे. मारिया शारापोव्हाने 2004 मध्ये वयाच्या 17 व्या वर्षी विम्बल्डन स्पर्धा जिंकली होती.

हेही वाचा: US Open जिंकणाऱ्या १८ वर्षांच्या एमाबद्दल काही खास गोष्टी...

अमेरिकन ओपन स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या ग्रेट ब्रिटनच्या एम्मा राडूकानू आपल्या टेनिस कारकिर्दीत पुण्यातील कोर्टवरही खेळली आहे. 2019 मध्ये ITF स्पर्धेत ती डेक्कन जिमखान्यात खेळली होती. या स्पर्धेत एम्माने ऑस्ट्रेलियन ब्रिटन टेनिस खेळाडू असलेल्या नॅकथा बैन्सला पराभूत केले होते. पहिल्या ग्रँडस्लॅम विजयासह नवा इतिहास रचल्यानंतर भारतीय टेनिस चाहत्यांना पुण्यातील तिच्या कामगिरीची आठवण झाली असेल.

हेही वाचा: पालघरमध्ये जन्मलेला क्रिकेटर ओमानकडून खेळणार T20 World Cup

नव्या सम्राज्ञीच्या विजयात काही खास गोष्टीही आहेत. 2014 मध्ये सेरेना विलियम्स हिने एकही सेट न गमावता अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर आता अशीच कामगिरी एम्मानं करुन दाखवली आहे. टेनिस क्रमवारीत 150 व्या स्थानावर असताना तिने जेतेपद पटकावण्याचा पराक्रमही आपल्या नावे केला. अमेरिकन ओपन स्पर्धेतील ऐतिहासिक कामगिरीनंतर ती आता क्रमवारीत मोठी झेप घेऊन थेट 23 ते 25 व्या क्रमांकावर विराजमान होईल.

loading image
go to top